Home पंढरपूर …….अखेर “त्या” महिलेला जामीन मंजूर.

…….अखेर “त्या” महिलेला जामीन मंजूर.

589
0

पंढरपूर:- शहरातील चौफाळा येथे दोन महिन्याच्या तान्हुल्याला सोडून जाणाऱ्या “त्या” महिलेला जामीन मंजूर झाला आहे. महिलेवर भादवि ३१७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी महिलेच्या वतीने ॲड. किर्तीपाल सर्वगोड यांनी काम पाहिले.
शहरातील चौफाळा येथे एक महिलेने दोन महिन्याच्या बालकाला सोडून पलायन केले होते. त्या चिमुकल्याचा सांभाळ महिला पोलिसांनी केला. प्रयत्नांची पराकाष्ठा करुन अखेर पोलिसांनी त्या महिलेस ताब्यात घेतले. चौकशीअंती त्या महिलेला अटक केले. पालनपोषण न करण्याच्या उद्देशाने त्या महिलेने दोन महिन्याच्या चिमुकलीला रस्त्यावर सोडले होते. अनैतिक संबधातून हे मुल जन्मले होते.
ही आरोपी महिला घटस्फोटित आहे. हीला एक पंधरा वर्षाची एक मुलगी आहे. अनैतिक संबधातून तिला दुसरे मुल झाले होते. पोलिसांनी अटक केल्यानंतर १५ वर्षच्या मुलीला सोलापूरच्या अनाथाश्रमात तर दोन महिन्याच्या चिमुकलीला पंढरपूरच्या नवरंगे बालकाश्रमात दाखल करण्यात आले होते.
आज या महिलेला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी ॲड. किर्तीपाल सर्वगोड यांनी जोरदार युक्तीवाद केला. हा युक्तीवाद ग्राह्य धरुन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मे. सरोदे यांनी जामीन मंजूर केला.