Home महाराष्ट्र अत्याधुनिक तंत्राचा वापर करून घरात केली गांजाची शेती .

अत्याधुनिक तंत्राचा वापर करून घरात केली गांजाची शेती .

808
0

मुंबई गुन्हे शाखा कक्ष 3 ची कारवाई

पंढरपूर:- आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राहत्या घरातच गांजाच्या झाडाची लागवड करणाऱ्याला 14 डिसेंबर रोजी बेड्या ठोकण्यात आल्या. ही उत्तम कारवाई मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 3 चे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्यामुळे पोलीस पथकाला करता आली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी 2 लाख 90 हजार रुपयांचा गांजा, एमडी जप्त केले. तसेच अत्याधुनिक पद्धतीने लागवड केलेली गांजाची रोपे व इतर साहित्य असे एकूण 6 लाख रुपयांचे साहित्य जप्त केले.

गांजाची झाडे

मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी अमलीपदार्थ तस्कऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 3 च्या पथकातील पोलीस निरीक्षक नितीन पाटील हे पथकासह चेंबूर, आरसीएफ, देवनार परिसरात गस्त घालण्यासाठी गेले. त्यावेळी चेंबूर, माहुलगाव येथील बीपीसीएल कंपनीच्या समोर उभ्या असेेल्या एका इसमावर पोनि नितीन पाटील यांना संशय आला. पोलिसांनी त्याला इसमाला हटकले असता तो पळू लागला. मात्र पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्या इसमाकडील बॅगेची झडती घेतली असता त्यात 1 किलो गांजा व 54 ग्रॅम एमडी आढळून आले.


अमलीपदार्थ तस्करी प्रकरणी एनडीपीएस कायदा कलम 8(क), 20(ब) सह 22(क) नुसार गुन्हा दाखल करून निखील शर्मा (26) याला कक्ष 3 च्या पोलिसांनी अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गांजाबाबत पोलिसांना सर्व माहिती दिली. मित्राच्या घरात हायड्रोपोनिक ग्रो सिस्टमचा वापर करून गांजाची झाडं कुंड्यांमध्ये लावल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलीस पथकाने माहुल गाव परिसरातील शर्मा याच्या मित्राच्या घराची झडती घेतली असता तेथे 3 हायड्रोपोनिक ग्रो सिस्टम टेंट, कुंड्या, एलईडी लाईट, टायमर यंत्रणा, पीएच सॉईल टेस्टर, आर्द्रता मापक, हायड्रोपोनिक न्यूट्रियंट्स, विविध जातीच्या गांजाच्या बिया, बी उगवण्यासाठी पेपर टावेल आढळून आले. सदर साहित्य पोलिसांनी जप्त केले.
इंटरनेटवरील वेगवेगळ्या साईट्सवरून गांजा लागवडीसाठी लागणारे साहित्य, केमिकल्स, अमीलपदार्थ शर्मा मागवत असल्याचे तपासादरम्यान उघडकीस आले आहे.
अत्याधुनिक पद्धतीने मुंबईसारख्या ठिकाणी घरातच गांजाच्या झाडाची लागवड करणाऱ्याचा पर्दाफाश सह पोलीस आयुक्त (गुन्हे) संतोष रस्तोगी, गुन्हे प्रकटीकरणचे उपायुक्त शहाजी उमाप, सहाय्यक पोलीस आयुक्त (मध्य) नेताजी भोपळे, गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 3 चे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक खोत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनाली भारते, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन भारती, पोलीस उपनिरीक्षक मोहसिन पठाण, हवालदार दीपक चव्हाण, पोलीस नाईक शिवाजी जाधव, मंगेश पवार, पोलीस शिपाई भास्कर गायकवाड, यलप्पा तांबडे आदी पथकाने केला.
पोलिस मित्र यांच्या फेसबुक वॉल वरुन