Home महाराष्ट्र Big Breaking ….. शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंतांचा राजीनामा. राज्यात सत्ता स्थापनेच्या...

Big Breaking ….. शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंतांचा राजीनामा. राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग .

402
0

पंढरपूर:- शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकारमध्ये तरी का रहायचे? आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा देत आहे, असं म्हणत शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

लोकसभा निवडणुकीआधी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना तो मान्य होता. आता हा फॉर्म्युला नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभीमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपाने फारकत घेतलीच आहे, अशी टीका सावंतांनी केली आहे.
सावंतांनी राजीनामा दिल्याने कॉंग्रेस आघाडीच्या पाठिंब्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. कॉंग्रेस आघाडीच्या पाठिंबा पाहिजे असेल तर पहिल्यांदा शिवसेने एन डी ए मधून बाहेर पडावे अशी अट आघाडीने घातली होती. आता सेनेचा आघाडीच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.