Home सोलापूर अल्पवयीन मुलीवर दहा जणांचा सामुहिक बलात्कार . पाच अटक , पाच...

अल्पवयीन मुलीवर दहा जणांचा सामुहिक बलात्कार . पाच अटक , पाच फरार .

3671
0

दहा जनांपैकी 5 आरोपी अटकेत ; 5 फरार 
सोलापूर:- शहरातील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दहा जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर इतर आरोपींचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता.आरोपीवर बलात्कार, ॲट्रॉसिटी या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सामूहिक बलात्कार प्रकरणातील बहुतेक आरोपी हे रिक्षाचालक असल्याचं सांगण्यात आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की सोलापूर विजापूर रोडवरील एका मंदिराजवळ एक अल्पवयीन मुलगी रडत बसली होती. त्यावरून शहरातील एका सुज्ञ नागरिकांने जवळ असलेल्या पोलिस ठाण्याला फोन करून ही माहिती दिली. पोलिसांनीही घटनास्थळी जाऊन मुलीस विश्वासात घेतले आणि रडरण्याबाबत विचारणा केली.तेव्हा तिने बलात्कार झाला असल्याची माहिती पोलिसांना सांगितली. पोलिसांनी तिला आधार देत विश्वासात घेऊन आणखी विचारणा केली असता तिने घडलेली हकीकत पोलिसांना दिली आणि मती गुंग करेल अशी घटना उघडकीला आली आहे.
सुरुवातीला एका तरुणाबरोबर या पीडित मुलीचे प्रेम संबंध होते. त्या तरुणाचे इतर सर्व आरोपी मित्र असल्याचे समोर आले आहे. मुलीस वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला कधी गाडी मध्ये ,कधी लॉजमध्ये, कधी शेतामध्ये आदी ठिकाणी नेऊन बलात्कार करण्यात आलेला आहे. एका दिवशी तर चौघांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला असल्याचा समोर आलं आहे .
पीडित मुलगी ज्या शाळेत जाते त्या मार्गावर हे संशयित आरोपी प्रवासी वाहतूक करत असणारे रिक्षाचालक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत पीडित मुलीच्या फिर्यादीनुसार विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती टिपरे या करीत आहेत.
मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी विजापूर नाका पोलीस ठाणे येथे आयपीसी 376 त्याचप्रमाणे ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यापैकी पाच आरोपींना अटक केली आहे पुढील तपास सुरू आहे.
प्रीती टिपरे, सहाय्यक पोलीस आयुक्त
 
सतर्क पोलिसांमुळेच घटना उघडकीस
घटनेचे गांभीर्य ओळखून सहाय्यक पोलीस आयुक्त टिपरे व पोलीस निरीक्षक शेंडगे यांनी पीडित मुलीस विश्वासात घेऊन चौकशी केल्याने हा प्रकार उघड झाला.
बहुतांशी आरोपी रिक्षाचालक
या गुन्ह्यात एकूण दहा पैकी बहुतांश आरोपी हे रिक्षाचालक आणि अन्य वाहन चालक आहेत. विशेष म्हणजे हे सर्व आरोपी रिक्षाचालक हे मुलीच्या शाळेच्या मार्गावर रिक्षा चालवतात. त्यामुळे शाळा सुटली ते मुलीला रिक्षातून घेऊन जाणे आणि कार्यभाग उरकणे अशी पद्धत असल्याचे सांगण्यात आले आहे.
गेल्या जुलैपासून सुरू होता हा प्रकार
प्रेम प्रकरणातून आलेला शरीरसंबंधचा पहिला प्रकार गेल्या जुलै महिन्यातील आहे. त्यानंतर मूळ मित्र बदलला आणि त्यानंतर एकाचे दोन,दोनाचे चार असे होत तब्बल दहा जण या प्रकरणात सामील झाले. गेल्या दीड महिन्यापर्यंत हा प्रकार चालू होता.