Home मंगळवेढा अल्पवयीन मुलीवर दोघांनी केला लैंगिक अत्याचार. पोक्सो अंर्तगत पोलिसात गुन्हा दाखल.

अल्पवयीन मुलीवर दोघांनी केला लैंगिक अत्याचार. पोक्सो अंर्तगत पोलिसात गुन्हा दाखल.

812
0

मंगळवेढा:- शहरानजीक असलेल्या घाटूळ वस्ती येथील एका अल्पवयीन मुलीवर दोन अज्ञातांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. बळजबरीने शारिरिक संबंध ठेवून अत्याचार केल्याने ती गरोदर आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की , सदरची घटना मे महिन्यात घडली आहे. १६ वर्षे ७ महिन्याची असलेली पिडीत मुलगी किराणा माल घेवून घाटूळ वस्ती येथील घराकडे येत असताना एका अनोळखी मुलाने तीला बळजबरीने ऊसात ओढत नेवून तीच्या मनाविरूध्द शरीरसंबंध केले .त्यानंतर दहा ते बारा दिवसांनी दुसऱ्या एका अनोळखी मुलाने तीला शेतातील ऊसात बळजबरीने नेवून लैंगिक अत्याचार केले. याची कुठे वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

त्या दोन अनोखळी मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याने पिडीत मुलगी गरोदर राहिली आहे. सध्या ती पंढरपूर तालुक्यातील एका ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहे.

याची फिर्याद त्या मुलीने करकंब पोलिस स्टेशनला दाखल केली. ती शुन्य क्रमांकाने मंगळवेढा पोलिस स्टेशनला वर्ग करण्यात आली आहे.

पोलिसांनी सदर दोन अनोळखी इसमाविरूध्द भादंवि कलम ३७६ ( १ ) , ५०४ , ३४ , बाललैंगिक अत्याचार संहिता २०१२ चे कलम ४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक सचिन खटके हे करीत आहेत.