Home महाराष्ट्र अवैधरित्या चिंकारा जातीचे हरीण बाळगल्याप्रकरणी एकावर कारवाई.

अवैधरित्या चिंकारा जातीचे हरीण बाळगल्याप्रकरणी एकावर कारवाई.

166
0

इंदापूर :-(भीमसेन उबाळे) अवैधरीत्या चिंकारा जातीचे हरीण बाळगल्याच्या आरोपावरून इंदापूर पोलीसांनी शहरातील सरस्वतीनगर भागातील युवकास रविवारी (दि. १) जिवंत हरणासह ताब्यात घेतले. त्याच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरपर्यंत सुरु हाेती.
परमेश्वर अंकुश काळे (वय ३३, रा. सरस्वतीनगर, इंदापूर, जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत इंदापूरचे वनरक्षक एस. व्ही. गीते यांनी िफर्याद िदली. वनपरिक्षेत्र अधिकारी राहूल काळे यांनी िदलेल्या मािहतीनूसार, आरोपी काळे याने सरस्वतीनगर येथील आपल्या राहत्या घरी एक वर्षे वयाचे चिंकारा जातीचे हरीण बाळगल्याचा प्रकार इंदापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे पथकाचे काकासाहेब पाटोळे, विशाल चौधर, विक्रम जाधव यांनी उघडकीस आणला. जिवंत हरणासह आरोपीस ताब्यात घेतले. हरीण वनविभागाच्या ताब्यात दिले.

आरोपीने अवैधरित्या वन्यजीव स्वतःकडे बाळगून त्याची वाहतूक केल्याने वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरु हाेती. पुणे वनविभागाचे उपवनसंरक्षक राहूल पाटील, सहाय्यक उपवनसंरक्षक राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी राहूल काळे, वनपाल व्ही. एस. खारतोडे, वनरक्षक एस. व्ही. गीते, वनमजूर बाळू वाघमारे, एल. एन. कुंभार, राजेंद्र कांबळे, सुरेश पवार, निखिल जगताप कसोशीने तपास करत आहेत.

इंदापूर तालुक्यातील वनपरिक्षेत्राचा भाग वन्यप्राण्यासाठी अभयवन म्हणून घोषित करण्यात आला आहे. वन्यजीवांना स्वतःजवळ बाळगणे, त्याची शिकार करणे यास कायद्यान्वये गुन्हा आहे. कोणी असे कत्य करत असेेेल तर लोकांनी तातडीने त्याची माहिती वनविभागाला द्यावी.

-राहुल काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी