Home पंढरपूर आपण यांना पाहिलत का? माढ्याच्या खासदारांचा शोध सुरु .

आपण यांना पाहिलत का? माढ्याच्या खासदारांचा शोध सुरु .

1739
0

अस्मानी-सुलतानी संकटात खासदार गायब.
पंढरपूर :- राज्यात परतीच्या पाऊसाने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. डोळ्या देखत पिके नासली आहेत. तर दुसरीकडे राज्यातील सरकार अद्याप स्थापन झाले नाही. राज्यकर्ते राजकारणात व्यस्त आहेत. त्यामुळे बळीराजा सध्या अस्मानी आणि सुलतानी संकटांना तोंड देत आहे. माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह निंबाळकरांनी मात्र मतदारसंघातील शेतकऱ्यांकडे पाठ फिरवली आहे . त्यामुळे सध्या सोशल मिडियावर मिम्स च्या माध्यमातून निंबाळकरांवर टीकेचा मारा केला जातोय.
कृष्णा-भीमा स्थिरीकरणाचे आश्वासन देवून निंबाळकर माढ्यात खासदार झाले. सांगोला, माढा, माळशिरस, करमाळा या दुष्काळग्रस्त तालुक्यात पाणी आणणार असा विश्वास त्यांनी निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान मतदारांना दिला. सहाच महिन्यात शेतकऱ्यांना दुष्काळ आणि ओला दुष्काळ असा अस्मानी संकटांना सामोरे जावे लागत आहे. राज्यात काळजीवाहू सरकार असल्याने कोणताही ठोस निर्णय घेण्यास तयार नाही. अशा वेळी निंबाळकरांनी मतदारसंघातील बळीराजाच्या बांधावर जावून दिलासा देणे गरजेचे आहे. मात्र खासदार तोंड दाखवायला तयार नाहीत.
मतदारसंघात उस, केळी , डाळिंब पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्ष बागा झोपल्या आहेत.
खासदार निंबाळकरांच्या या बळीराजाच्या अनास्थे बद्दल सोशल मिडियावर टीका केली जात आहे. “खासदार साहेब मतदारसंघातील शेतकरी सध्या अस्मानी, सुलतानी संकट कोसळले आहे. तुम्ही कुठे असाल तिथून परत या. तुम्हाला कोणीही रागावणार नाही.” अशी उपहासात्मक टीका सध्या सोशल मिडियावर केली जात आहे.