Home महाराष्ट्र आमदार भारत भालकेंनी घेतली मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट .

आमदार भारत भालकेंनी घेतली मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट .

802
0

पंढरपूर :- पंढरपूरचे कॉंग्रेस आमदार भारत नाना भालकेंनी मनसे प्रमुख राज ठाकरेंची कृष्णकुंजवर आज सदिच्छा भेट घेतली. यावेळी संतोष सुळे, मनसे सहकार आघाडीचे अध्यक्ष दिलीप धोत्रे आदी उपस्थित होते.


नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीमध्ये मनसेने पंढरपूर विधानसभा मतदारसंघात आमदार भालकेंना सहकार्य केले होते. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचे आभार यावेळी मानण्यात आले. अत्यंत अटीतटीच्या लढतीत आमदार भालकेंनी सरतेशेवटी बाजी मारली. त्यानंतर भालकेंनी निवडणूक काळात सहकार्य करणाऱ्या नेत्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
मनसे प्रमुख राज ठाकरेंनी देखिल मोठ्या उत्साहात “या नाना या, तुमचे स्वागत आहे” अशा शब्दात स्वागत केले. आमदार भालकेंनी राज ठाकरेंचा सत्कार केला. यावेळी उभयतांमध्ये राज्यात परतीच्या पाऊसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीवर चर्चा झाली. तसेच पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघावरही सविस्तर चर्चा झाली.