Home पंढरपूर आमदार भारत भालकेंना मंत्री करा-राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचे पवारांना भावनिक पत्र .

आमदार भारत भालकेंना मंत्री करा-राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचे पवारांना भावनिक पत्र .

1567
0

आदरणीय साहेब
नमस्कार ,

साहेब आजवर वडीलधारी मंडळी आपल्या मुलांना/ नातवंडांना आपल्या बद्दल सांगायचे पण आज त्या सर्व मुलांनी / नातवंडांनी व उभ्या अखंड महाराष्ट्राने आपले राजकारण आणि आपली चाणक्य नीती पहिली.

त्या साठी मला तुकाराम महाराज यांच्या अभंगा मधील एक वाक्य आठवले

गरुडपारावरी उभा राहिलासी । आठवें मानसीं तें चि रूप ॥उद्धव अक्रूर उभे दोहींकडे । वर्णिती पवाडे सनकादिक ॥तुका म्हणे नव्हे आणिकांसारिखा । तो चि माझा सखा पांडुरंग ॥५॥

साहेब ज्या सत्ताधारी मंडळींनी राष्ट्रवादी संपवणार असा पावित्रा उचलला होता व त्यांना आपल्यातीलच काही नेते मंडळींनी आपली साथ सोडून त्यांना मदत पुरवली अश्या परिस्थितीत आपण स्वतः मैदानात उतरून तो पवित्रा मोडीत काढला.
साहेब हे तुम्हीच करू शकता असा विश्वास आम्हा कार्यकर्त्यांना होता .ज्यांना आपण भरभरून दिले ते मात्र अडचणीच्या काळात पक्षाला व आपल्याला सोडून गेले पण पंढरपूर शहरात व तालुक्यात काम करत असताना ज्या ज्या वेळी मोठे कार्यक्रम आम्ही घेतले त्या त्या वेळी आमदार भारत नानांनी केवळ आपल्या प्रेमाखातर आमच्या सारख्या फाटक्या कार्यकर्त्यांना नेहमीच आर्थिक बळ देऊन पक्ष मोठा करण्यास मदत केली ,प्रत्येक वेळी नाना म्हणायचे भले माझा पक्ष वेगळा असेल पण साहेबांवर माझे प्रेम होते आहे आणि कायम राहणार ,त्यामुळे नानांनी नेहमी पक्षाला मदत केली आणि आज तर आपल्या पक्षाचे विजयी उमेदवार ही झालेत.

साहेब मी आजवर पंढरपूरच्या पांडुरंगा कडे काहीच मागितलं न्हवते कारण पंढरपुरात जन्म मिळणे हेच खूप भाग्याचे होते पण माझ्या विठोबा जवळ मी या विधानसभा निवडणुकीत एक साकडे घातले होते
राष्ट्रवादी काँग्रेस चे सरकार स्थापन होण्या साठी माझा नेता माझे दैवत आदरणीय साहेब यांची साथ दे व आदरणीय साहेबाच्या मार्गदर्शनावर चालणारे पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील उमेदवार भारत तुकाराम भालके यांना प्रचंड बहुमतांनी निवडून दे

साहेब पंढरपूर मधील राजकारण व येथे होत असणाऱ्या राजकीय घडामोडी आपण ठाऊक असालच पण एकीकडे पैसा व एकीकडे माणुसकी असे या वेळेसचे चित्र होते

त्यात विजय झाला तो माणुसकी चा

जिथे माणुसकी आणि स्वतः पवार साहेब सोबत उभे आहेत तिथे हार नावाचा प्रकार नसतो यावर आम्ही पंढरपूरकर ठाम होतो

आदरणीय साहेब पंढरपूर च्या पांडुरंगा कडे जे साकडं घातलं होत ते माझ्या विठोबा ने पूर्ण केले
तसेच एक साकडे / आमच्या मागण्या आम्ही आपणस या पत्रा द्वारे घालतोय

साहेब देशाला स्वातंत्र्य मिळाल्या पासून पंढरपूरला एकही मंत्री पद भेटले नाही.
अनेक वेळा महामहिम राष्ट्रपती / पंतप्रधान पंढरपुरात येऊ गेले पण त्यांच्या स्वागताला पंढरपुरातील कोणी मंत्री समोर न्हवते हे तितकेच दुःख वाटते
आदरणीय भारत नाना भालके हे गरीब / श्रीमंत असा भेदभाव न करता प्रत्येकाच्या सुख दुःखात सामील असतात व प्रत्येकाच्या अडचणीला मदत करण्यास समोर ठाम उभे असतात.
गोर गरीब जनतेसाठी पुढे येऊन जनते साठी लढा देत असताना स्वतः च्या वर गुन्हे दाखल होत आहेत हे न पाहता पण समोर ठाम उभे राहून लढणारा हा नेता आहे.
पंढरपूर मंगळवेढा हाच माझा मतदार संघ आहे मी इथेच काम करणार असा कधीच विचार भारत नाना करीत नाहीत
नानाचे आपल्या मतदार संघात प्रेम आहे तसेच पूर्ण जिल्ह्यावर प्रेम आहे

त्या साठीच आपणास एक कळकळीची विनंती करतोय की या अश्या बलाढ्य प्रेमळ असणाऱ्या नेत्याला जनतेची सेवा करत असताना आपल्या सहमतीने मंत्रीमंडळात सामील करून पंढरपूर ला मानाचे स्थान द्यावेत

आदरणीय साहेब ही विनंती व आपणास असणारे साकडं आहे

आपल्या सोबत असणारा एक छोटा कार्यकर्ता
सुरज ज्ञानेश्वर पेंडाल
(सोलापूर जिल्हा सचिव राष्ट्रवादी युवक )
पंढरपूर