Home पंढरपूर आमदार राणा पाटलांनंतर खासदार ओमराजे निंबाळकरांवर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल .

आमदार राणा पाटलांनंतर खासदार ओमराजे निंबाळकरांवर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल .

975
0

पंढरपूर :- कळंब पंचायत समिती वादाला आता वेगळे वळण लागले आहे. भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटलांनंतर आता शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांचेवरही अकलुज पोलीसात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब पंचायत समिती निवडणूक आता रंगतदार अवस्थेत पोचली आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात तुळजापूर भाजप आमदार राणा जगजीतसिंह यांचेपाठोपाठ शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांचेवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे . भाजप गटाचे ३ पंचायत समिती सदस्य शिवसेने अकलुज येथील बोरगाव मध्ये आणल्याची माहिती मिळाल्यावर भाजप आमदार राणा जगजीतसिंह हे या सदस्यांना घेण्यासाठी अकलूजमध्ये पोहचले. त्यानंतर झालेल्या वाद आणि मारामारी नंतर राणा पाटलासह त्यांच्या सहकाऱ्यांवर खुनाच्या प्रयत्नासह काही गंभीर कलमानुसार गुन्हा दाखल केला होता . यावेळी आमदार जगजीतसिंह यांची गाडी व ३ कार्यकर्त्याना पोलीसांनी ताब्यात घेतले होते .
आता यावेळी पकडण्यात आलेले सतिश दंडनाइक यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांचेसह ९ जणांविरोधात अकलुज पोलीसात गुन्हा दाखल केला आहे . या प्रकरणाला भाजप सेना वादापेक्षा पद्मसिंह पाटील व ओमराजे निंबाळकर हा वाद कारणीभुत आहे .