Home महाराष्ट्र आरपीआय मधून दिपक निकाळजे निलंबित- प्रदेश सरचिटणीस राजा सरवदेंची घोषणा .

आरपीआय मधून दिपक निकाळजे निलंबित- प्रदेश सरचिटणीस राजा सरवदेंची घोषणा .

2550
0

मुंबई:- रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष दीपक निकाळजे यांना पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे रिपाइंतून निलंबित करण्यात आले असल्याची अधिकृत घोषणा रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांनी केली आहे.

दीपक निकाळजे यांच्या विरुद्ध अनेक तक्रारी पक्षाला प्राप्त झाल्या आहेत. ते रिपब्लिकन पक्षाविरुद्ध भूमिका घेऊन पक्ष विरोधी काम करीत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. त्यांच्या विरुद्ध काही गंभीर आरोपांची तक्रार रिपब्लिकन पक्षाकडे आली आहे. त्यामुळे दीपक निकाळजे यांना रिपब्लिकन पक्षातून निलंबित करण्यात येत असल्याची अधिकृत घोषणा रिपाइं चे राज्य चे सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांनी केली आहे.
दीपक निकाळजे यांची आरपीआयच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याच्या पोस्ट सोशन मिडीयावर फिरत आहेत. त्यामुळे ही कारवाई झाल्याची चर्चा आहे. दीपक निकाळजे हे छोटा राजनचे बंधू आहेत. तसेच आरपीआयचे राज्य उपाध्यक्ष होते.