Home महाराष्ट्र आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवलेंचा अवमान. आरपीआयच्या वतीने निषेध.

आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवलेंचा अवमान. आरपीआयच्या वतीने निषेध.

3538
0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यात अवमान झाल्याने केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंची तीव्र नाराजी

मुंबई:- नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यात केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांना शेवटच्या रांगेत आसन व्यवस्था देऊन राजशिष्टाचार पायदळी तुडवीत अवमान केला गेल्याची माहिती समोर आल्याने तीव्र नाराजी व्यक्त करणारे पत्र ना.रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.

शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस च्या महाविकास आघाडी सरकार ला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा नाही मात्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहणे नैतिक दृष्टीने योग्य असल्याने तसेच या शपथविधी सोहळ्याचे रितसर निमंत्रण आपणास प्राप्त झाल्याने आपण या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहिलो.

नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्यक्तीशः आमचे चांगले मित्र आहेत. शिवशक्ती भीमशक्ती महायुती आम्ही एकत्र केली. त्यातून राज्यात सत्तांतर घडले तसेच मुंबई महापालिकेत ही शिवसेनेची सत्ता अबाधित राहिली. शिवशक्ती भीमशक्ती एकजुटीमुळे आमची मैत्री घनिष्ठ झाली. त्यामुळे मुख्यमंत्री पदी विराजमान झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला उपस्थित राहून त्यांचे रिपाइं तर्फे हस्तनांदोलन करून अभिनदंन केले . मात्र केंद्रियराज्यमंत्री म्हणून राजशिष्टाचार धोरणानुसार आपणास पुढील रांगेत आसनव्यवस्था देणे क्रमप्राप्त होते. या शपथविधी सोहळ्यात राजशिष्टाचार न पाळता केंद्रियराज्यमंत्री पदावर असतानाही आपणास मागील रांगेत बसविण्यात आले.याबाबत केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.तसे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.

या शपथविधी सोहळ्यास महत्वाच्या व्यक्तींना प्रवेशद्वार क्र 2 ने प्रवेश दिला जात असताना केंद्रियराज्यमंत्री म्हणून माझ्या वाहनाला प्रवेशद्वार क्र 7 न प्रवेश दिल्याने राजशिष्टाचार मोडण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही लक्ष द्यायला पाहीजे होते. अशी ना रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.