Home पंढरपूर आ.रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरीत हमाल मापाडी यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप

आ.रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरीत हमाल मापाडी यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप

100
0

पंढरपूर:- कर्जत जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार व अखिल भारतीय साखर कारखाना संघटनेचे अध्यक्ष आ.रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने पंढरीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कार्यरत हमाल व मापाडी यांना हमाल मापाडी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी शिंदे यांच्या हस्ते मोफत सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात.यावेळी राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे शहराध्यक्ष संदीप मांडवे,सीताराम रणदिवे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बाबत अधिक माहिती देताना शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष गणेश गोडसे म्हणाले कि,आमचे मार्गदर्शक आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रोज नित्य अनेक लोकांशी संपर्क येत असलेल्या कृषीउत्पन्न बाजार समितीमधील कष्टकरी हमाल व मापाडी बांधवांच्या आरोग्य रक्षणार्थ सॅनिटायझर आणि मास्कची गरज ओळखून वाटप करण्यात आले.
यावेळी हमाल मापाडी संघटनेचे पदाधिकारी मारुती बनपट्टे,देवा गांडूळे,मधू वाघ,आबाजी शिंदे,संतोष सावंत,हरिभाऊ कोळी,राजाभाऊ जाधव,श्रीमंत डांगे,अंकुश कदम,रघुनाथ कांबळे,भीमा धनवे,नवनाथ सुरवसे,बाळासाहेब घोडके,उत्तरेश्वर गोफणे,समाधान आवताडे यांच्यासह शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी बालाजी खंदारे,सोमनाथ ढवण,विकास घोलप,नागनाथ शिरतोडे,महेश बोचरे,अविनाश पवार,अमोल रणदिवे आदी उपस्थित होते.

आ.रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन

प्रचंड जनसंपर्क,सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाची जाण,तरुणाईशी थेट संवाद या माध्यमातून कार्यरत असलेले आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभर अनेक सामाजिक व विधायक उपक्रम राबविले जातात.आज आ. रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम आम्ही आज राबिवला आहे.व त्यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यातही असेच विधायक उपक्रम राबविण्याचा मानस आहे – गणेश गोडसे (जिल्हाध्यक्ष :शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान )