Home पंढरपूर उपरा की निष्ठावंत? उपनगराध्यक्ष निवडीवरून शहर विकास आघाडीत बिघाडी !

उपरा की निष्ठावंत? उपनगराध्यक्ष निवडीवरून शहर विकास आघाडीत बिघाडी !

785
0

पंढरपूर:- पंढरपूर नगरपालिकेच्या विषय समित्यांची निवड नुकतीच पार पडली. आता 20 जानेवारी रोजी तीन स्वीकृत नगरसेवक आणि उपनगराध्यक्षांची निवड होणार आहे. मात्र समितीच्या निवडीवरून पडलेली ठिणगी आता उपनगराध्यक्ष पदावरून वणवा बनण्याची शक्यता निर्माण झालीय.

स्वीकृत नगरसेवकांमध्ये अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा निर्माण पंढरपूर शहर विकास आघाडीने घेतल्याचे समजते. तर उपनगराध्यक्ष पदासाठी उपरा की निष्ठावंत ? यावरून आता आघाडीत धुसफूस सुरू झालीय.

विषय समिती निवडीमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी शहर विकास आघाडीत दाखल झालेल्या एका नगरसेवकाला सभापती पदी संधी देण्यात आली. आणि त्याचवेळी उपरा की निष्ठावंत अशी ठिणगी पडली. काही जेष्ठ नगरसेवकांनी याला आक्षेप घेतला होता. आणि उघड नाराजी व्यक्त केल्याचे समजते.
आता उपनगराध्यक्ष निवडीत देखील माजी आरोग्य सभापती विवेक परदेशींचे नाव आघाडीवर आहे. मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी आघाडीत सामील झालेल्या नगरसेवकाला संधी मिळणार असल्याच्या चर्चेने आघाडीत वणवा पेटण्याची स्थिती निर्माण झालीय.

पंढरपूर शहर विकास आघाडीत उपरा विरूद्ध निष्ठावंत असे दोन गट पडल्याची चर्चा सध्या शहरात आहे.
काही दिवसात विधानसभेची पोटनिवडणुक , वर्षाच्या शेवटी नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. त्यामुळे आघाडी एकसंघ ठेवण्याचे मोठे आव्हान आघाडी प्रमुखांवर आहे. उपऱ्या नगरसेवकाला संधी दिल्यास परिचारक गट विधानसभेची पोटनिवडणुक लढणार असल्याची चर्चा सुरू झालीय. तसेच स्वीकृत नगरसेवक पदी देखील बाहुबली नेत्यांना संधी दिली जाऊ शकते अशी समीकरणे बांधली जात आहेत.

आघाडीत निष्ठावान गटाने नगरसेवक विवेक परदेशी यांना उपनगराध्यक्ष पदी संधी देण्याची मागणी केली जात आहे. कोरोना काळात आरोग्य सभापती म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली होती. स्वतः ला कोरोना झाला तरी तण, मन, धन लावून काम केले. कोणत्याही लोभाला, दबावाला बळी न पडता शहर विकास आघाडीचे नगरसेवक आघाडीच्या नेत्यांशी एकनिष्ठ राहून काम करत आहेत. त्यामुळे उपरा आणि निष्ठावंत हा वाद पंढरपूर शहर विकास आघाडीच्या नेत्यांच्या अंगलट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.