Home पंढरपूर ऐतिहासिक राममंदिरचा “सर्वोच्च” निकाल शनिवारी लागणार, पोलिसांचा तगडा बंदोबस्त.

ऐतिहासिक राममंदिरचा “सर्वोच्च” निकाल शनिवारी लागणार, पोलिसांचा तगडा बंदोबस्त.

913
0

पंढरपूर:- देशातील इतिहासातील “सर्वोच्च” निकालाची घटका काही तासांवर आली आहे. शनिवारी सकाळी १०:३० सुप्रीम कोर्ट आपला निकाल देणार आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर देशात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात ही पोलिसांनी तगडी तयारी केली आहे.
१३५ वर्षानंतर ऐतिहासिक असा निकाल शनिवारी येणार आहे. सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले आहे. मंदिर, मशीद की काय? या प्रश्नावर उद्या शनिवारी पडदा पडण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई याचे पाच जणांचे खंडपीठ हा निकाल देणार आहे.
या निकालामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये साठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. बॅनरबाजी, पोस्टरबाजी , सोशल मिडियावर वादग्रस्त पोस्ट टाकू नये अशा सुचना पोलिसांनी दिल्या आहेत. तसेच निकाल काहीही लागला तरी एखाद्याला त्रास होईल असा जल्लोष करु नये असे कळवण्यात आले आहे.
दरम्यान मंदिर आणि मशीदीच्या दोन्ही बाजुच्या समर्थकांनी आपल्या अनुयायांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.

एक महिना सोशल मिडियावर आयोध्ये संबधी पोस्ट नको- दयानंद गावडे (पंढरपूर पोलिस निरीक्षक)
शनिवारी आयोध्या प्रकरणाचा निकाल लागल्यापासून ते पुढील एक महिना आयोध्या विषयावर कोणतीही वादग्रस्त पोस्ट सोशल मिडियावर टाकू नये, शेअर करु नये किंव्हा त्यावर कमेंट करु नये अशा सुचना पंढरपूर शहर पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिल्या आहेत. सध्या पंढरपूरात कार्तिकी यात्रेनिमित्त लाखो भाविक दाखल झाले आहेत. त्यामुळे कोठे वादग्रस्त वक्तव्य , जल्लोष न करण्याच्या सुचना देखिल करण्यात आली आहे.