Home पंढरपूर कार्तिकी यात्रेवर आषाढी प्रमाणे निर्बध; पोलीस आणि सामान्य प्रशासनाच्या वेगवेगळ्या आदेशाने संभ्रमात...

कार्तिकी यात्रेवर आषाढी प्रमाणे निर्बध; पोलीस आणि सामान्य प्रशासनाच्या वेगवेगळ्या आदेशाने संभ्रमात वाढ.

213
0

पंढरपूर :-पंढरपूरची कार्तिकी यात्रा 26 नोव्हेंबर रोजी होत आहे. या यात्रेसाठी संपूर्ण राज्यातून पंढरपूरकडे दिंड्या जात असतात. यंदाच्या वर्षी राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना शासनाने पंढरपूरकडे दिंड्या पाठवू नकात. असा आदेश नुकताच पारित केला आहे. त्यामुळे यंदाची कार्तिकी वारी निर्बंधातच होईल. हे निश्चित होत आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजनाचे आदेश काढल्याने संभ्रम निर्माण झालाय.

कार्तिकी यात्रेसाठी महाराष्ट्र राज्याच्या सर्व जिल्ह्यातून पायी दिंड्या पंढरपूरकडे येत असतात. तसेच खासगी आणि एस टी बसने देखील भाविक पंढरपुरात येतात . यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी आपल्या जिल्ह्यातून पंढरपूरकडे दिंड्यांना जाऊ देऊ नये. अशा आशयाचे आदेश राज्य शासनाच्या वतीने पाठवण्यात आले आहेत. तर पोलीस प्रशासनाने पंढरपूरात दाखल होणार्या वाहनांच्या पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करण्यास सुरुवात केलीय. त्यामुळे कार्तिकी यात्रेवरून प्रशासनातच एकमत नसल्याचे चित्र दिसत आहे.
त्यामुळे आषाढी नंतर कार्तिकीवरही निर्बंध आल्याचे दिसून येत आहे.