Home पंढरपूर कोरोनाच्या नावाखाली उपचारास टाळाटाळ करणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाईसाठी आता होणार जन आंदोलन. वाचा...

कोरोनाच्या नावाखाली उपचारास टाळाटाळ करणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाईसाठी आता होणार जन आंदोलन. वाचा कोणी दिला इशारा.

356
0

पंढरपूर:- कोरोनाने जगभर हाहाकार माजवल्यानंतर आता भारतात कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत आहे.त्यात सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्र आहे.त्यामुळे वैद्यकीय यंत्रणेवर प्रचंड ताण आहे.काही रुग्णालये व डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी दिवसरात्र काम करत आहेत.

मात्र असे असले तरी अनेक रुग्णालये कोरोनाच्या साथीचे निमित्त पुढे करून सर्वच रुग्णांना उपचार करण्यास टाळाटाळ करत आहेत.असेच काही प्रकार पंढरपूर शहरातील रुग्णालयात घडल्याने काहीजणांना आपला जीव गमवावा लागला होता.याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पंढरपूरचे नगरसेवक व बांधकाम सभापती विक्रम शिरसट यांनी स्वतःहून दखल घेत रुग्णांना प्राथमिक उपचार करण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या रुग्णालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
सध्या पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे.याच काळात  इतर आजाराने ग्रस्त असलेला एखादा रूग्ण उपचार घेण्यासाठी आला असता त्याला तातडीने उपचार मिळणे गरजेचे असतानाही रूग्णालयांकडून प्रथमोपचार मिळण्यास विनाकारण विलंब लावला जात आहे.तसेच गरज नसतानाही अनेकवेळा सोलापूरला हलविण्याचा सल्ला दिला जात आहे. यामुळे रूग्णांचा मृत्यू देखील होण्याची शक्यता आहे.याचा विचार करून रूग्णालयांनी प्रथमत: रूग्णांवर प्रथमोपचार करावे  व रूग्णांना जीवनदान द्यावे अशा मागणीचे निवेदन पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांना नगरसेवक विक्रम शिरसट यांनी दिले आहे.या मागणीची तात्काळ दखल घेण्यात यावी अन्यथा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खाजगी व सरकारी रूग्णालयांमध्ये प्रथम उपचार न मिळाल्यास त्या रूग्णालयांसमोर उपोषण करणार असल्याचा इशारा नगरसेवक विक्रम शिरसयट यांनी दिला आहे.