Home पंढरपूर कोरोनापासून बचाव करण्यासाठी व्यायाम करा- राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी व्यायाम करा- राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आवाहन.

127
0

इंदापूर :- (भीमसेन उबाळे) महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ इंदापूर तालुका शहर ग्रामीण मराठी पत्रकार संघ आणि डीऐ सामाजिक संस्था,यांच्या संयुक्त विद्यमाने ई- मॅरेथॉन आयोजित केलेल्या स्पर्धेचे उद्घाटन ना.दत्तात्रय (मामा)भरणे यांच्या हस्ते 15 नोव्हेंबर रोजी इंदापूर तालुका क्रीडा संकुल येथे करण्यात आले.
यावेळी बोलताना ना. भरणे यांनी सध्या कोरोनामुळे प्रत्येकाला व्यायामाचे महत्व लक्षात आलंय. त्यामुळे यापुढे व्यायामच आपला कोरोना पासून बचाव करू शकतो असं सांगत भरणे यांनी नागरिकांना व्यायाम करण्याचे आवाहन केले.

              यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते,शिवसेनेचे इंदापूर तालुका प्रमुख नितीन शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे,इंदापूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर,पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विरसिंहभैय्या रणसिंग,तालुका क्रिडा अधिकारी महेश चावले,सीवाय आयडी संस्थेचे संचालक प्रवीण जाधव,पत्रकार संघाचे मार्गदर्शक मधुकर गलांडे,मुख्य सचिव सागर शिंदे, कार्याध्यक्ष जावेद मुलाणी,उपाध्यक्ष संदीप सुतार,जिल्हा संपर्कप्रमुख महेश स्वामी, पुणे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ ढोले,तालुका संघटक भिमराव आरडे,उदयसिंग जाधव देशमुख,शिवकुमार गुणवरे,रामदास पवार,लक्ष्मण सांगवे,बाळासाहेब कवळे,भीमसेन उबाळे,प्रेस फोटोग्राफर अक्षय आरडे,तसेच पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे संजय सोनवणे,शिवसेना इंदापूर शहर प्रमुख महादेव सोमवंशी,माथाडी कामगार सेनेचे दूर्वास शेवाळे, क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शरद झोळ,कुस्ती कोच मारुती मारकड,शिवधर्म फाऊंडेशनचे अण्णासाहेब काटे, बाळासाहेब ढवळे,दत्तात्रय व्यवहारे,विनायक वाघमारे, एडवोकेट आशुतोष भोसले,अरबाज शेख,भाऊराव झेंडे, प्राध्यापक सुनील मोहिते यांच्यासह जिल्हा पातळीवर राष्ट्रीय पातळीवर खेळणारे खेळाडू युवक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.