Home पंढरपूर कोरोनाशी दोन हात करण्यासाठी पंढरपूरचे सैन्यदल सज्ज. गावातील शाळांचे रूपांतर हॉस्पिटलमध्ये होणार....

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी पंढरपूरचे सैन्यदल सज्ज. गावातील शाळांचे रूपांतर हॉस्पिटलमध्ये होणार. वाचा सविस्तर तुमच्या गावासाठी काय आहे सोय.

2642
0

पंढरपूर :- जगात हाहाकार माजविणार्या कोरोनाशी दोन हात करण्यासाठी पंढरपूरची आरोग्य यंत्रणा सज्ज झालीय. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली माक्रो मॅनेजमेन्ट करण्यात आले आहे. ग्रामपातळी पासून तालुकास्तरिय व्यवस्थापन करण्यात आले आहे.
पंढरपूर तालुक्याची लोकसंख्या ३ लाख ४३ हजार ४४५ आहे. तालुक्यातील १०१ गावांमध्ये ९४ ग्रामपंचायती आहेत. या गावातील ४५२ जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. विभागवार कमिटी स्थापन करण्यात आल्या आहेत.
अलगीकरण, नियंत्रण आणि बफर झोन करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी,प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक आणि तलाठी यांचे पथक तैनात करण्यात आले आहे. तर घरोघरी जावून तपासणी करण्यासाठी आरोग्य कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, आशा वर्कर, आंगणवाडी सेविका, पोलिस पाटील यांच्यावर जबाबदारी देण्यात आलीय.

पंढरपूर शहरात अलगीकरणासाठी गजानन महाराज मठामध्ये ३० बेड ठेवण्यात आले आहे. तर ग्रामीण भागात करकंब येथिल शुभम मंगल कार्यालयात २० बेडची सोय करण्यात आली आहे.

विलगीकरणाची सोय पंढरपूरच्या संसर्गजन्य रुग्णालय १३ बेड,
आरोग्य भवन ७ बेड, कॉटेज हॉस्पिटल आय सी यु ९ बेडची सोय करण्यात आलीय. अडचणीच्या काळात ०२१८६-२२५१०१ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर करकंब येथे ग्रामीण रुग्णालयात १० बेड आणि जगताप हॉस्पिटलमध्ये १० बेडची व्यवस्था करण्यात आलीय. येथिल संपर्क क्रमांक ०२१८६-२४२४२५ हा आहे.

तसेच गावनिहाय अलगीकरणाची सोय करण्यात आली आहे. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ही सोय करण्यात आली आहे. गावात वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आले असून त्यांचे नाव आणि संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे.
कासेगाव डॉ. एस एस पाटील (८६००३९६१७२),
गादेगाव डॉ. ए एस तांबोळी (९४२१६६६७६८),
खर्डी डॉ. व्हि एन जाधव (९८९०१७०१४५) ,
तुंगत डॉ. एस आर नवत्रे (९५६१२४९६१४)
रोपळे डॉ. शेंडगे (९४२०३४२६१९)
भाळवणी डॉ. ए डी रेपाळ (९४२०५४३०९४)
पुळुज डॉ. ए एस स्वामी (९५११८००६६२)
उंबरेपागे डॉ. पी एस साखरे (९७६३४०८०३१)

पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या नेतृत्वाखाली तालुका शिघ्र प्रतिसाद पथक स्थापन करण्यात आले आहे. यामध्ये तहसीलदार वैशाली वाघमारे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. प्रदीप केचे, करकंब ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. तुषार सरवदेंचा समावेश आहे. तसेच रॅपिड रिस्पॉन्स टीम देखिल तयार करण्यात आलीय.

तालुक्यातील एकूण ८ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ४२ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कोरोना विरूध्द लढा उभारण्यात आला आहे.
तालुक्यात प्रांताधिकारी, पोलिस उपाधिक्षक, तहसीलदार, पोलिस निरिक्षक यांच्यासह १६ वैद्यकीय अधिकारी, १६ आरोग्य सहाय्यक, ११ आरोग्य सहाय्यीका, ३८ आरोग्य सेविका, ६३ आरोग्य सेवक, १६ गटप्रवर्तक ३४७ आशा वर्कर आणि ५१५ अंगणवाडी सेविकांचे सैन्यबळ कोरोनाशी युध्द करण्यास सज्ज आहे. सुदैवाने पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नाही. त्यामुळे नागरिकांनी १४ एप्रिल पर्यंत घरातच राहून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे. खबरदारी तुमची जबाबदारी आमची हेच ब्रीदवाक्य घेवून पंढरपूरची शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.