Home पंढरपूर कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी पंढरीतील सात रुग्णालये सज्ज.

कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी पंढरीतील सात रुग्णालये सज्ज.

1398
0

पंढरपूर :- कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पहाता जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सर्व विभागांची बैठक घेवून महत्वाच्या सुचना दिल्या आहेत. पंढरपूर हे तिर्थक्षेत्र असल्याने येथे विशेष काळजी घेण्यात येणार आहे. पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयासह शहरातील सात नामवंत हॉस्पिटलमध्ये सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिले.
सोलापूर शहरासह, पंढरपूर, अकलूज आणि बार्शी येथिल सुसज्ज हॉस्पिटलला दक्ष राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
पंढरपूर मध्ये विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयासह शहरातील लाईफलाईन हॉस्पिटल, जनकल्याण हॉस्पिटल, विठ्ठल हॉस्पिटल, ॲपेक्स हॉस्पिटल, गॅलेक्सी, सेवा आणि डॉ. शितल शहा यांचे नवजीवन हॉस्पिटलचा समावेश आहे.
या सातही हॉस्पिटल मधिल किमान पाच बेड राखीव ठेवण्यात आले आहे. हे स्पेशल वॉर्ड मध्ये आयसोलेशन केले असून व्हेंटीलेटरसह सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आलीय.
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. हस्तांदोलन टाळा, गर्दीची ठिकाणे टाळा, मास्क आपली सर्व प्रकारची काळजी घ्यावी. प्रशासन कोरोनाशी लढा देण्यास सज्ज आहे. घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.