Home पंढरपूर गुन्ह्यात मदत करतो म्हणून पाच हजार रुपयांची लाच घेणारा पोलिस गजाआड.

गुन्ह्यात मदत करतो म्हणून पाच हजार रुपयांची लाच घेणारा पोलिस गजाआड.

1645
0

पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात आहे हेड कॉंस्टेबल

पंढरपूर :- मोबाईल चोरीच्या गुन्ह्यामध्ये मदत करतो म्हणून सहा हजाराची लाच मागणाऱ्या पोलिसाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी रात्री उशिरा अटक केली आहे. बापू उत्तम झोळ( ब.नं- १०९१ हेड कॉंस्टेबल पंढरपूर शहर पोलिस ठाणे रा.विनायक अपार्टमेंट, टाकळी रोड पंढरपूर) असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. गेली एक महिना झाले हे लाच नाट्य रंगले होते.

पंढरपूर शहर पोलीस ठाणे मध्ये तक्रारदाराच्या मुला विरुद्ध मोबाईल चोरीचा गुन्हा दाखल होता. या गुणाच्या तपासामध्ये मदत करतो आणि दुसऱ्या गुंह्यात न घेण्यासाठी म्हणून बापू उत्तम झोळ याने सहा हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोड करून पाच हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांकडे ११ सप्टेंबर रोजी तक्रार केली होती. यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक जगदीश भोपळे यांनी यांनी या सर्व प्रकरणाची पडताळणी केली. लाचलुचपत विभागाने लावलेल्या सापळ्यात हेडकॉन्स्टेबल बापू उत्तम झोळ याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पंचाच्या समोर लाचेची मागणी केली. त्यामुळे पंढरपूर शहर पोलिस ठाण्यांमध्ये बापू झोळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आले.

ही कारवाई लाचलुचपत प्रंतिबंधक विभागाचे पोलीस उपआयुक्त राजेश बनसोडे, अपरपोलीस अधिक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. जगदीश भोपळे, सहाफौजदार निलकंठ जाधवर, पोकॉ. सिध्दाराम देशमुख, पोकॉ. प्रफुल्ल जानराव यांनी केली आहे.