Home ताज्या बातम्या गोपाळपूरच्या श्री विठ्ठल अभियांत्रिकीत सेतू सुविधा केंद्राचे उदघाटन

गोपाळपूरच्या श्री विठ्ठल अभियांत्रिकीत सेतू सुविधा केंद्राचे उदघाटन

157
0

शैक्षणिक वर्ष २०१९-२० करीता प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या (पदवी) प्रवेशासह सर्व विभागांची माहिती एकाच छताखाली मिळून विद्यार्थ्यांची धांदल उडू नये यासाठी महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षा मार्फत सेतू सुविधा केंद्राची (केंद्र क्र.६२२०) स्वेरीमध्ये स्थापना केली आहे. शुक्रवार दि.७ जून २०१९ पासून सर्व विभागासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्याची प्रक्रिया श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरु झाली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी दिली.

येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी (पदवी) महाविद्यालयात प्रथम वर्ष अभियांत्रिकीसाठी शुक्रवार , दि. ७ जून २०१९ पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची, कागदपत्रे पडताळणी, अपलोडींग आदी सबंधित प्रक्रिया सुरू झाली असून याचे उदघाटन मंगळवेढ्यातील नूतन मराठी विद्यालयाचे संचालक परशुराम महालकरी व सिताराम काळे यांच्या हस्ते व विद्यार्थी, पालक व उपप्राचार्य डॉ. दिनकर यादव , प्राध्यापकवर्ग यांच्या उपस्थितीत झाले. रजिस्ट्रेशन करण्यासाठी विद्यार्थ्याचा फोटो, १० वी व १२ वी मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला, सीईटी / जेईई परीक्षा अर्ज, हॉल तिकीट, स्कोर कार्ड, व हमीपत्र (जर दिले असेल तर), कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलीडीटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमेलीअर (गरज असल्यास), नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, डोमेसाईल सर्टिफिकेट, अपंगत्वाचा दाखला (लागू असेल तर ), उत्पन्नाचा दाखला या कागदपत्रांसह रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून याचा लाभ सर्व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी घ्यावा. सदर प्रक्रियेसाठी सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली उच्च शिक्षित प्राध्यापकवर्ग, आधुनिक संगणक, १०२४ एम.बी.पी. एस.लीज लाईन क्षमता असलेली इंटरनेट सुविधा, वातानुकुलीत हॉलसह संबंधित सर्व बाबी सज्ज आहेत.पूर्वी फॅसिलिटेशन सेंटर क्र.-६२२० म्हणून ओळखले जाणारे केंद्र आता सेतू सुविधा केंद्र क्र.-६२२० म्हणून ओळखले जाणार आहे. अभियांत्रिकी पदवीच्या प्रवेश प्रक्रियेत गेल्या तीन वर्षापासून बदल होत असून विद्यार्थ्यांमध्ये गोधळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेचे नियम बदलल्यामुळे विद्यार्थ्याबरोबर पालक ही चिंतेत असतात. त्यांची शंका दूर करण्यासाठी स्वतंत्र माहिती कक्षाची देखील स्थापना केली असून यामध्ये अभियांत्रिकी व फार्मसीच्या पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवीच्या प्रवेशाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जात आहे. या ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया नंतर भरलेल्या फॉर्म मधील झालेल्या चुकांच्या दुरुस्तीसाठी कालावधी देणार आहेत. त्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रवेशाच्या मुख्य कॅप राउंडस सुरु होतील. पदवी अभियांत्रिकीच्या संबंधी अधिक माहितीसाठी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या http://www.mahacet.org या वेबसाइटला भेट द्यावी किंवा पदवी अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता डॉ. पी. एस. कचरे (९५४५५५३७७४), स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार (९५४५५५३८८८) प्रा. यु. एल. अनुसे (९१६८६५५३६५) व प्रा. पी. के. भुसे (९२८४०७७०८०) तसेच टोल फ्री क्रमांक १८०० ३००० ४१३१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. स्वेरीमध्ये ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाच्या सोयीमुळे विद्यार्थ्यांना आता खात्रीशीर मार्गदर्शन मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा व पालकांचा वेळ वाचत आहे. यामुळे एकूणच ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाबरोबरच आनंदाचे वातावरण पसरले आहे. विद्यापीठात सर्वोत्कृष्ट निकाल, कॅम्पस प्लेसमेंटमध्ये आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या महत्वाच्या बाबींमुळे यावर्षीही विद्यार्थी व पालकामध्ये श्री विठ्ठल अभियांत्रिकीचाच बोलबाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here