Home पंढरपूर गोपीचंद पडळकर “ते” अवमानकारक वक्तव्य मागे घ्या – केंद्रीय राज्यमंत्री रामदास...

गोपीचंद पडळकर “ते” अवमानकारक वक्तव्य मागे घ्या – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

1896
0

मुंबई – शरद पवार हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत सर्व महाराष्ट्राला ते आदरणीय आहेत त्यांच्याबद्दल गोपीचंद पडळकर यांनी केलेले वक्तव्य अयोग्य अवमानकारक असून ते वक्तव्य त्यांनी मागे घ्यावे असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज ज्योतिबा फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचा आदर्श तत्व पाळणारा महाराष्ट्र आहे. एकमेकांचा आदर करणे हे महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याबाबत केलेले वक्तव्य मागे घ्यावे.असे ना रामदास आठवले म्हणाले.
शरद पवार आणि आम्ही राजकीय दृष्ट्या वेगळे आहोत. त्यांच्या सोबत मी नाही.माझी राजकीय युती भाजप सोबत आहे. आमचे पक्ष वेगळे असले तरी मी नेहमी शरद पवार यांच्याबाबत आदर व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.शरद पवार यांचे योगदान मोठे असल्याने त्यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणे चुकीचे आणि महाराष्ट्राच्या वैभवशाली परंपरेवर कलंक लावणारे आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांनी ते वक्तव्य मागे घ्यावे असे ना रामदास आठवले यांनी सांगितले आहे.