Home पंढरपूर घरमालक डेंग्यूने ॲडमिट, चोरट्यांनी घर लुटले.

घरमालक डेंग्यूने ॲडमिट, चोरट्यांनी घर लुटले.

1558
0

८ तोळ्याचे दागिने लंपास.
पंढरपूर :- घरमालक डेंग्यूने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्याची संधी साधत चोरट्यांनी घरफोडी करुन तब्बल ८ तोळे आणि मोबाईल लंपास केल्याची घटना रोपळे गावात रविवार ३ नोव्हेंबर रोजी घडली आहे. याबद्दल पंढरपूर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
सचिन उत्तम जाधव (वय-३७ रा. रोपळे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सचिन जाधव हे त्यांना डेंग्यू झाल्याने शहरातील एका हॉस्पिटलमध्ये १ नोव्हेंबर पासून ॲडमिट झाले होते. घटनेच्या दिवशी ३ नोव्हेंबरच्या रात्री जाधव यांच्या घरी त्यांच्या आई एकट्याच होत्या. जाधव हे हॉस्पिटलमध्ये असल्याने यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मुक्कामी होत्या. घरी आई एकटी असल्याची संधी चोरट्यांनी साधली. चोरट्यांनी खिडकीतून घरात प्रवेश केला. आणि जाधव यांच्या घरातून २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, १२ ग्रॅम सोन्याचे नेकलेस, ५ ग्रॅम सोन्याची जाड चैन, १५ ग्रॅम वजनाची सोन्याची कानातील वेल आणि झुबे, ५ ग्रॅमच्या दोन अंगठ्या आणि २ ग्रॅमच्या रिंग असा तब्बल ८ तोळे २ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एक मोबाईल लंपास केला आहे. याची एकूण किंमत १ लाख ९७ हजार रुपये आहे. ही चोरीची घटना समजताच सचिन जाधव हे त्यांना लावलेल्या सलाईनसह पहाटे घरी दाखल झाले. घरी चोरी झाल्याचे पाहून त्यांचे अवसानच गळले. तात्काळ त्यांनी ग्रामीण पोलिसांना चोरीची माहिती दिली.
सोलापूर डेली ब्रेकिंग
लाचलुचपत विभागाची कारवाई , शहर पोलिस ठाण्याचा कर्मचारी ताब्यात …. सविस्तर लवकरच

गुन्ह्यात मदत करतो म्हणून पाच हजार रुपयांची लाच घेणारा पोलिस गजाआड.

पंढरपूर शहर तालुक्यात साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. घरटी एक व्यक्ती आजारी आहे. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याने घरी कोणीच नसल्याचा फायदा आता चोरटे घेत असल्याचे दिसत आहे.
सदरच्या चोरी प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून ग्रामीण पोलिस पुढील तपास करत आहेत.