Home पंढरपूर ….. चक्क श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या लॉकर मधून मोबाईल लंपास ....

….. चक्क श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या लॉकर मधून मोबाईल लंपास . वाचा एक अनोखी चोरी .

1028
0

पंढरपूर :- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या मोबाईल लॉकर मधून भाविकाचा मोबाईल लंपास झाल्याची घटना घडली आहे. महेश वसंत पवार (रा. हडपसर पुणे) हे सहकुटुंब देवदर्शनासाठी पंढरीत आले होते. त्यांच्या पॉकेट चोरून चोरांनी लॉकर मधून चार मोबाईल देखिल लंपास केले आहेत.
याबद्दल सविस्तर माहिती अशी की, महेश पवार हे आपल्या खासगी वाहनाने पंढरीत दाखल झाले. शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथील पार्किंगमध्ये वाहन लावून ते दर्शनासाठी गेले.
मंदिरात मोबाईल घेवून जाण्यास बंदी आहे. त्यामुळे पवारांनी विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीच्या लाँकर मध्ये मोबाईल जमा करून पावती घेतली. दर्शन घेवून मंदीराचे बाहेर आले. काही वेळाने त्यांच्या लक्षात आले, की पाठीमागील खिश्यातील पाँकेट गायब आहे.
त्यानंतर महेश पवार हे मोबाईल घेण्यासाठी मंदिर समितीच्या लाँकर रूम मध्ये गेले. यावेळी समितीच्या कर्मचाऱ्यांनी तुम्ही ठेवलेल्या लाँकर मधील मोबाईल, तुम्हाला दिलेली पावती दाखवून कोणीतरी घेवून गेले आहेत.
चोरांनी ह्या अनोख्या चोरीसाठी चांगलीच आयडियाची कल्पना वापरली आहे. त्याच्या या आयडियाने पोलिस हि चक्रावून गेले आहेत. पहिल्यांदा पॉकेटची चोरी अन् नंतर चक्क लॉकर मध्ये पावती दाखवत चार मोबाईलची चोरी. सदरची घटना लॉकरच्या सी सी टीव्हीत कैद झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लाँकरमध्ये ठेवलेले चार मोबाईल व पॉकेट चोरून नेल्याची तक्रार महेश पवार यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. तसेच पाकिट मध्यील आधारकार्ड, पॅनकार्ड, अँक्टीव्हा मो.सा.चे आर.सी.बुक, ए.टी.एम.कार्ड व ३८०० रुपयांची रोख रक्कम चोरली आहे.