Home सोलापूर चोरी करताना “पोलिस”च सापडला रंगेहाथ .

चोरी करताना “पोलिस”च सापडला रंगेहाथ .

1827
0

पंढरपूर :- आजपर्यंत चोराला पोलिसांनी पकडल्याचे आपण ऐकले, वाचले आणि पाहिले असेल. मात्र अक्कलकोट पोलिसांनी चक्क पोलिसालाच चोरी करताना रंगेहाथ पकडल्याने पोलिस दलात एकच खळबळ माजली आहे. जप्त वाहनाचे टायर चोरताना सोलापूर शहर मधिल जेलरोड पोलिस ठाण्याच्या पोलिसाला अक्कलकोट पोलिसांनी पकडले आहे.
याबद्दल दाखल गुंह्यानुसार सविस्तर माहिती अशी की, अक्कलकोट नॉर्थ पोलिस ठाण्यात चोरीचा ट्रक( MH- 12 AU 7637) जप्त केला आहे. हा ट्रक अक्कलकोटच्या जुन्या पोलिस वसाहती समोर लावला आहे. घटनेच्या दिवशी ७ जानेवारी रोजी सायंकाळी ५:३० च्या दरम्यान यातील पोलिस कर्मचारी भाऊसाहेब ब्रम्हदेव शिंदे(नेमणूक-जेलरोड पोलिस ठाणे सोलापूर शहर) सोमा विठ्ठल गायकवाड( रा. बोळकवठा दक्षिण सोलापूर) गणेश मल्लेशी मरेवाले, दयानंद बसवराज यळकर (दोघे रा. मंदृप) या चार जणांनी पोलिसांनी जप्त केलेल्या वाहनाचे टायर, ट्युब आणि डिस्क चोरल्याचा आरोप ठेवला आहे.
याप्रकरणी पोहेकॉ. संतोष चंद्रकांत मिस्त्री यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपींवर ३७९ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सपोनि राठोड हे करीत आहेत.