Home पंढरपूर जनादेश मिळून ही सरकार स्थापन होत नसल्याचे दु:ख – चंद्रकांत दादा पाटील,...

जनादेश मिळून ही सरकार स्थापन होत नसल्याचे दु:ख – चंद्रकांत दादा पाटील, सरकार स्थापन होण्याबाबत पाटलांना शंका .

918
0

पंढरपूर:- राज्यातील जनतेने महायुतीला स्पष्ट जनादेश दिला आहे. जनतेने मोठ्या विश्वासाने हा जनादेश दिला असताना सरकार स्थापन होत नसल्याचे दु:ख राज्याचे महसूल मंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केले. कार्तिकी यात्रेच्या श्री विठ्ठलाच्या शासकीय महापुजेसाठी ते पंढरीत आले आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने ते राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होण्याबाबत साशंक असल्याचे दिसून आले.
भाजपाने राजकारणामध्ये टीकाटिप्पणी केली. पण शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे व शरद पवार यांचा कधीही अनादर केला नाही. परंतु नरेंद्र मोदी यांच्याबाबत बेताल वक्तव्य केले जात असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केले.
पुढे बोलताना पाटील म्हणाले, सत्तेसाठी इतर पक्षाचे आमदार फोडण्याची भाजपची संस्कृती नाही. निवडणूकीपुर्वी जे भाजपात आले त्यांनी विकासाचा दृष्टीकोण समोर ठेवला होता. भाजपच विकास करु शकेल असा त्यांना विश्वास असल्याने त्यांनी भाजपात प्रवेश केला.
उद्या विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्याने मुख्यमंत्री शपथ घेणार का ? प्रश्नाचे थेट उत्तर देणे त्यांनी टाळले.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे जाणते नेते आहेत असे कौतुक केले.
निसर्गाबाबत काही चुका झाल्या असल्यास बा विठ्ठलाने लेकरु समजून माफ करावे अशी मागणी महापुजेवेळी श्री विठ्ठला करणार असल्याचे पाटील म्हणाले. तसेच ऋतूमाना बद्दल काळजी व्यक्त करत ऋतूमान पहिल्यासारखेच व्हावे असेही ते म्हणाले.