Home पंढरपूर जन्मदिनीच चार वर्षाच्या श्लोकचा अंगावर भिंत पडून मृत्यु.

जन्मदिनीच चार वर्षाच्या श्लोकचा अंगावर भिंत पडून मृत्यु.

623
0

भिंत कोसळून पाच वर्षीय बालकाचा मृत्यू

पंढरपर:- विठ्ठल मंदिरा नजीक असणाऱ्या तांबेकर गल्ली येथे जुन्या बांधकामाची भिंत कोसळून पाच वर्षे बालकाचा मृत्यू झाला आहे. सदरची घटना गुरुवारी दुपारी 4 वाजता घडली.

येथील तांबेकर गल्ली येथे एका जुन्या वाड्याचे पाडकाम सुरू आहे. याठिकाणी जुनी भिंत पाडण्याचे काम सुरु असताना. अचानक भिंतीचा भाग रस्त्यावर कोसळला. यामध्ये गल्लीत खेळणारा पाच वर्षीय श्लोक रविंद्र घन यांचा भिंतीखाली दबुन मृत्यु झाला आहे.यामध्ये श्लोकचा हात जागेवर निकामी झाला. आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यु झाला आहे. आज श्लोकचा वाढदिवस होता. याप्रकरणी संबधित वाड्याच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी श्लोकच्या घरच्यांनी केलीय.