Home मंगळवेढा सख्ख्या भावाने पेटवले भावाचे कुटुंब, मुलाचा मृत्यू, पती-पत्नी गंभीर जखमी.

सख्ख्या भावाने पेटवले भावाचे कुटुंब, मुलाचा मृत्यू, पती-पत्नी गंभीर जखमी.

1920
0

मंगळवेढा:- कर्ज फेडण्यावरुन झालेल्या वादातून चिडून जावून सख्ख्या भावाच्या कुटुंबाला पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना महंमदाबाद (हुन्नुर) ता.मंगळवेढा येथे दि.६ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ च्या सुमारास घडली आहे.
या घटनेत शरद सोपान घुंबरे (वय.१२) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर सोपान रामचंद्र घुंबरे (वय.४५) व सोनाबाई सोपान घुंबरे (वय.४०) हे दोघे पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी लक्ष्मण रामचंद्र घुंबरे (वय.४२) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी कि, दि.६ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ च्या दरम्यान फिर्यादी सोपान रामचंद्र घुंबरे,पत्नी सोनाबाई व मुलगा शरद असे घराचा दरवाजा उघडा ठेवुन घ झोपले होते. फिर्यादीचा सख्खा भाऊ आरोपी लक्ष्मण रामचंद्र घुबरे याने फिर्यादीच्या घरात येऊन फिर्यादी त्याचे झालेले कर्ज फेडण्यासाठी पुढाकार घेत नाही. तसेच रेशनिग कार्ड वेगवेगळे करण्याकरीता असणाऱ्या त्रुटींची पूर्तता करत नाही या कारणावरून चिडून जावून त्याने सोबत आणलेल्या प्लास्टीकच्या पिशवीतील पेट्रोल फिर्यादीच्या अंगावर व फिर्यादीच्या पत्नी सोनाबाई तसेच मुलगा शरद यांच्या अंगावर टाकून त्याचे जवळील काडी पेटीने पेटवून दिले. यामध्ये शरदचा मृत्यू झाला आहे. तर सोपान आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले आहे. घडलेल्या प्रकाराने तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. पुढील तपास मंगळवेढा पोलिस करीत आहेत.