Home पंढरपूर जिल्हा परिषद सदस्य गोपाळ अंकुशराव उर्फ सरजी मतदानासाठी जिल्हा परिषदेत दाखल .

जिल्हा परिषद सदस्य गोपाळ अंकुशराव उर्फ सरजी मतदानासाठी जिल्हा परिषदेत दाखल .

4045
0

पंढरपूर:- नगरसेवक संदीप पवारांच्या हत्येप्रकरणी मोक्का अंर्तगत कारागृहात असणारे गोपाळपुरचे जिल्हा परिषद सदस्य गोपाळ अंकुशराव उर्फ सरजी सभापती निवडीसाठी जिल्हा परिषदेत दाखल झालेत.


आज जिल्हा परिषदेच्या विविध विषयांच्या सभापती निवडी आहेत. राष्ट्रवादीचे संख्याबळ असून देखिल त्यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीत पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर राष्ट्रवादीने मोहिते पाटील गटाच्या सहा सदस्यांचे निलंबन केले होते. तर त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. अध्यक्षपद हातचे गेल्याने सभापती पदांची निवडणूक राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली आहे. तर मोहिते पाटलांनी देखिल थेट आव्हान दिले आहे. त्यामुळे एक एक मत महत्वाचे आहे.
आज थेट तुरुंगातून मोठ्या पोलिस बंदोबस्तात गोपाळ अंकुशराव उर्फ सरजी मतदानासाठी दाखल झाले. ते भाजपचे सहयोगी असल्याने त्यांचे मत भाजपाच्या समविचारी आघाडीच्या पारड्यात पडेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.