Home पंढरपूर जिल्ह्यातील 78527 शेतकऱ्यांची यादी अपलोड , ज‍िल्हाध‍िकारी शंभरकर यांनी घेतली आढावा बैठक

जिल्ह्यातील 78527 शेतकऱ्यांची यादी अपलोड , ज‍िल्हाध‍िकारी शंभरकर यांनी घेतली आढावा बैठक

1372
0

सोलापूर :- महात्मा ज्योत‍िराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून ज‍िल्ह्यातील 78527 पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आल्याची माह‍िती आज बैठकीत देण्यात आली.
महात्मा ज्योत‍िराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत ज‍िल्हाध‍िकारी म‍िल‍िंद शंभरकर यांनी आज आढावा बैठक घेतली. न‍ियोजन भवन येथे झालेल्या या बैठकीत ज‍िल्हा उपन‍िबंधक कुंदन भोळे, तहस‍िलदार श्रीकांत पाटील, अग्रणी बँक व्यवस्थापक क‍िसन मोटे आदी उपस्थ‍ित होते.
या बैठकीत अग्रणी व्यवस्थापक संतोष सोनवणे यांनी ज‍िल्ह्यातील ज‍िल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सार्वजन‍िक क्षेत्रातील बँक आण‍ि व‍िदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या 78527 कर्जदार शेतकऱ्यांची माह‍िती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. यामध्ये आणखी काही प्रमाणात शेतकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. नावे अपलोड करण्याच्या पह‍िल्या टप्याची मुदत उद्या म्हणजे 15 फेब्रुवारीपर्यंत आहे, असे श्री. सोनवणे यांनी सांगितले.
अध‍िकारी-कर्मचाऱ्यांसाठी प्रश‍िक्षण श‍िबीर
शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी पंढरपूर, माळश‍िरस, मंगळवेढा, सांगोला, अक्कलकोट, दक्ष‍िण सोलापूर आण‍ि उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व संबंध‍ितांचे प्रश‍िक्षण घेण्यात आले. हे प्रश‍िक्षण श्री. श‍िवछत्रपती रंगभवन येथे झाले. या प्रश‍िक्षणात तहस‍िलदार, गटव‍िकास अध‍िकारी, गावातील महाऑनलाईन, आपले सरकार, संग्राम केंद्राचे चालक यांचा समावेश होता.
आज करमाळा, माढा, बार्शी आणि मोहोळ या तालुकयातील अध‍िकारी कर्मचारी यांना प्रश‍िक्षण देण्यात आले. यामध्ये करमाळाचे सहायक न‍िबंधक दीपक त‍िजोरे, आबासाहेब गावडे यांनी कर्जमाफीची प्रक्रीया कशी राबवावी, काय काळजी घ्यावी याबाबत प्रश‍िक्षण द‍िले.