Home महाराष्ट्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी केली “ही” ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी केली “ही” मोठी घोषणा .

762
0

पंढरपूर :- विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ६३ व्या महापरिनिर्वाण दिनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. मुंबईतील बीआयटी चाळीतील बाबासाहेबांचे निवासस्थान आता राष्ट्रीय स्मारक होणार आहे. आज मुख्यमंत्री ठाकरेंनी सकाळी दादर येथे चैत्यभूमीवर जावून बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी , विधानसभा अध्यक्ष नाना पटोले , मंत्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेबांचे जीवन म्हणजे एक धगधगते अग्नीकुंड होते. त्यांच्या संघर्षाच्या जीवावर आज आपण निर्भयपणे स्वातंत्र्याचा आनंद घेत आहोत. तसेच ज्याप्रमाणे बाबासाहेबांच्या अधिवासाने पावन झालेले लंडन येथिल त्यांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषीत झाले. त्याचप्रमाणे मुंबईतील बीआयटी चाळीमधील दुसऱ्या माळ्यावरच्या खोलीत बाबासाहेबांचे २२ वर्ष वास्तव्य होते. या निवासस्थानातून बाबासाहेबांनी मानव उध्दाराच्या अनेक चळवळी उभारल्या. त्या निवासस्थानाचा राष्ट्रीय स्मारक म्हणून विकास करण्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्री ठाकरेंनी केली.
चैत्यभूमीवरुन थेट मुख्यमंत्री ठाकरे यांनी बीआयटीच्या बाबासाहेबांच्या निवासस्थानाला भेट दिली. हे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित व्हावे अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नुकतीच केली होती.