Home पंढरपूर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गाणे लावण्याची मागणी केल्याने मागासवर्गीय तरुणांना बेदम मारहाण.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गाणे लावण्याची मागणी केल्याने मागासवर्गीय तरुणांना बेदम मारहाण.

10286
0

पंढरपूर :- जिल्हा परिषदेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरिल गाणे पुन्हा एकदा लावण्याची मागणी केल्याने मागासवर्गीय तरुणांना बेदम मारहाण केल्याची घटना शिरढोण गावात घडलीय. याप्रकरणी चेतन ज्ञानेश्वर लोखंडे यांच्या फिर्यादीनुसार पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पोलिसात दाखल गुंह्यानुसार, २९ फेब्रुवारी रोजी शिरढोण येथिल जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन होते. या स्नेहसंमेलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरिल भीमराव एकच राजा हे गाणे सुरु होते. गाणे संपल्यानंतर फिर्यादी चेतन लोखंडे,मोहित गायकवाड,गणेश लोखंडे आणि अभिजीत लोकरे यांनी हेच गाणे पुन्हा लावण्याची मागणी केली. त्यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असणारे सूर्यकांत चंद्रकांत भुसनर याने तुमचा काय संबंध, तुम्ही निघून जा असा दम देत जातीयवादी शिवीगाळ केली. आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तेथे दर्लिंग मनोहर भुसनर, विकास रघुनाथ भुसनर, अक्षय रघुनाथ भुसनर, विनायक शंकर भुसनर,परमेश्वर पांडुरंग भुसनर, सिताराम किसन रानगट, दर्लिंग बाळासाहेब भुसनर, (सर्व. रा. शिरढोण ता. पंढरपूर) यांनी मसिकांत बिभीषण मुसाडे, ओंकार उत्तरेश्वर लोखंडे, महेश संजय लोखंडे,अक्षय संजय लोखंडे यांच्यासह तब्बल दहा महिलांना जातीवरुन शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

जाहिरात

चेतन लोखंडे यांच्या फिर्यादीनुसार आरोपींवर भा.द.वि. कलम ३२३,५०४,५०६,१४३,१४७,१४९ तसेच ॲट्रॉसिटी ॲक्ट १९८९ नुसार कलम ३(१)(5) , 3(1)(r) 3(2)(va) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास पोलिस उपअधिक्षक डॉ. सागर कवडे हे करीत आहेत.
जाहिरात

गावातील मागासवर्गीय वस्तीत राहणाऱ्या महिलांसह तरुणांना क्षुल्लक कारणावरून मारहाण झाली असल्याचा गंभीर घटना घडल्याने जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे. याप्रकरणी काही सामाजिक संघटनांनी मोर्चा काढण्याची तयारी केल्याचे समजते.