Home पंढरपूर “त्या” बॅंक अधिकाऱ्याने अश्लील मेसेजचे प्रकरण मिटवण्यासाठी संबधीत महिलेच्या परस्पर गहाण ठेवलेले...

“त्या” बॅंक अधिकाऱ्याने अश्लील मेसेजचे प्रकरण मिटवण्यासाठी संबधीत महिलेच्या परस्पर गहाण ठेवलेले सोने सोडवले. चेकने भरली कर्जाची रक्कम.

254
0

पंढरपूर :- पंढरपूरातील एका मोठ्या सहकारी बॅंकेच्या अधिकाऱ्याने बॅंक खातेदार महिलांना अश्लील मेसेज पाठवले होते. हा प्रकार गेली अनेक दिवस अनेक महिलांसोबत सुरु होता. अखेर शहरातील एका महिलेने त्या “असंतोषी” अधिकाऱ्याला म्ह म्ह म्हणे पर्यंत मारले. अखेर हे प्रकरण अंगलट येवू लागल्यानंतर त्याने त्या महिलेच्या परस्पर ५५ हजार रुपये चेकने भरून दागिने सोडवल्याची धक्कादायक बाब उघड झालीय.
सोलापूर डेलीने ह्या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर पंढरपूर तालुक्यात संतापाची लाट उसळली. पोलिसांच्या दामिनी पथकाने याप्रकरणी लक्ष घालून गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. काही महिला संघटना आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
लॉकडाऊन मध्ये सामान्य जनतेच्या हाताचे काम गेले आहे. त्यामुळे घरातील महिला सोने-चांदी गहाण ठेवून आपल्या संसाराचा गाडा चालवित आहेत. अशा महिला खातेदारांना अश्लील मेसेज पाठविणार्या बॅंक पाठीशी घालत असल्याचे चित्र आहे. बॅंकेने संबंधीत अ”संतोष”चा राजीनामा न घेतल्यास बॅंकेसमोर आंदोलन करण्यात येणार आहे. आता आजच्या बैठकीत बॅंकचे संचालक मंडळ काय निर्णय घेते याकडे तालुक्यातील महिला संघटनांचे लक्ष लागले आहे.