Home पंढरपूर देवाच्या गाभाऱ्यात स्नान करणे अधिकाऱ्यांना पडले महागात ; प्रकरणाची होणार सखोल चौकशी.

देवाच्या गाभाऱ्यात स्नान करणे अधिकाऱ्यांना पडले महागात ; प्रकरणाची होणार सखोल चौकशी.

746
0

पंढरपर :- विठ्ठला च्या प्रक्षाळ पूजा प्रकरणाची सखोल करण्याचा निर्णय आज मंगळवारी झालेल्या समितीच्या बैठकीत घेण्यात आलाय. तसेच चौकशी होईपर्यंत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देवाच्या गाभाऱ्यात प्रवेश बंदी करण्यात आलीय.

पंढरपूरची श्री विठ्ठलाची आषाढी यात्रा संपन्न झाल्यानंतर प्रत्येक वर्षी देवाचा थकवा घालवण्यासाठी प्रक्षाळ पूजा केली जाते. या पूजेत दरम्यान देवाला अभिषेक घालून अभ्यंग स्नान घातले जाते. मात्र यावर्षीची प्रक्षाळ पूजा वादाच्या भोवऱ्यात सापडली. देवळाच्या गाभार्‍यात अधिकाऱ्यांनी एकमेकांना स्नान घातल्याने विठू भक्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती.
आषाढी यात्रा पार पडल्यानंतर 9 जुलै रोजी श्री विठ्ठलाची व माता रुक्मिणी देवीची प्रक्षाळ पूजा पार पडते. कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर आषाढी यात्रा पूर्णतः रद्द करण्यात आले होते. मानाच्या पालख्या आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा असे दोन उत्सव यावेळी साजरे करण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी देखील कोरोनाचे नियम पाळत देवाच्या मूर्तीला कुठेही स्पर्श न करताच पूजा पार पडली होती. मात्र नऊ जुलै रोजी प्रक्षाळ पूजा करताना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोना महामारी चे सर्व नियम बाजूला ठेवून गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला. यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री विठ्ठल जोशी यांना देवाच्या गाभाऱ्यात स्नान घालण्यात आले. अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी एकमेकाला देवाच्या गाभाऱ्यात स्नान घातल्याने याबाबत विठू भक्तांमध्ये कमालीची नाराजी पसरली होती. देवाच्या प्रथा परंपरा मोडीत काढल्याने संबंधित अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी संभाजी ब्रिगेड व भाजपा शहर च्या वतीने करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत मंदिर समितीची आज उच्चस्तरीय बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारा संपन्न झाली. या बैठकीमध्ये घडल्या प्रकाराची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या प्रकरणातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना श्रीविठ्ठलाच्या गाभाऱ्यात आणि रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेशबंदी करण्यात आली असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
सदरच्या बैठकीला मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेश कुमार कदम, श्री भास्करगिरी किसनगिरी बाबा, श्री संभाजी शिंदे, आमदार. सुजितसिंह ठाकुर, ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, ॲड. माधवी निगडे, ह.भ.प प्रकाश जवंजाळ, श्री अतुल शास्त्री भगरे गुरुजी, ह. भ.प शिवाजीराव मोरे आणि सौ साधना भोसले आदी उपस्थित होते.