Home Uncategorized धक्कादायक …….. पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये मयत झालेल्या व्यक्तीचे सांगोल्याच्या एका ...

धक्कादायक …….. पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये मयत झालेल्या व्यक्तीचे सांगोल्याच्या एका गावात अंत्यसंस्कार.

26213
0

पंढरपूर :- देशात नव्हे तर जगात कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. एक महिना झाले देशात लॉकडाऊन लागु करण्यात आला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यबंदी , जिल्हाबंदी , गावबंदी करण्यात आलीय. मात्र सांगोला तालुक्यातील एका गावात धक्कादायक प्रकार घडलाय. ससून हॉस्पिटलमध्ये मयत झालेल्या एका व्यक्तीवर गावात अंत्यसंस्कार केले आहेत. त्यामुळे जिल्हा बंदीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
याबद्दल प्रशासनाने दिलेले माहिती अशी की दोन दिवसांपूर्वी पुण्यात एकाचा मृत्यू झाला होता. त्या मयत व्यक्तीच्या मुलाने मृतदेह पुण्याच्या ससून हॉस्पिटलमधून ताब्यात घेतला. आणि जवळपास २७० किलोमीटरचा प्रवास करून गाव गाठले. मध्यरात्रीच त्याने अंत्यसंस्कार उरकून घेतले. आणि सकाळी पुन्हा तो पुण्याकडे रवाना झाला. या कुटुंबाशी संबंधित दहा लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार योगेश खारमाटे यांनी दिली.
पुण्यात कडकडीत कर्फ्यू लागू करण्यात आलाय. तर सोलापूरात ३३ कोरोनाचे रुग्ण सापडल्याने प्रशासनाने जिल्हा बंदीची कडक अंमलबजावणी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र कोरोना जास्त मृत्यू दर असलेल्या पुण्यातून वाहन सांगोल्यात आले कसे? असा सवाल आता गावकऱ्यांच्या वतीने विचारला जात आहे. सोलापूरच्या ग्रामीण भागात प्रशासनाच्या प्रत्येक आदेशाचे पालन काटेकोरपणे केले जात आहे. मात्र जिल्हा बंदी कुचकामी ठरत असल्याचा आरोप आता गावातील नागरिक करत आहेत. सदरच्या घटनेने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.