Home पंढरपूर नगराध्यक्षा अरुणा माळींचा भ्रष्टाचार पुराव्यासह सिध्द करू – मंगळवेढ्याच्या मुख्याधिकारी...

नगराध्यक्षा अरुणा माळींचा भ्रष्टाचार पुराव्यासह सिध्द करू – मंगळवेढ्याच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांचे थेट आव्हान.

1443
0

पंढरपूर :- मंगळवेढ्यात प्रजासत्ताक दिनापासून मुख्याधिकारी विरुध्द नगराध्यक्षा, नगराध्यक्षा विरुध्द नगरसेवक, नगराध्यक्षा विरुध्द कर्मचारी असे बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यामध्ये आता मुख्याधिकारी सौ. पल्लवी पाटील यांनी नगराध्यक्षा सौ. अरुणा माळी यांना थेट आव्हान दिले असून वेळ पडल्यास नगराध्यक्षांचा भ्रष्टाचार आणि नगराध्यक्षा पतींची दमदाटी पुराव्यानिशी सिध्द करण्याचा इशार त्यांनी दिलाय.
पुढे बोलताना सौ. पाटील म्हणाल्या, आमच्याकडे नगराध्यक्षा सौ. माळी यांच्या भ्रष्टाचाराचे भक्कम पुरावे आहेत. त्यांच्या पतींनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या धमक्यांचे रेकॉर्डिंग आहे. आम्ही हे कधीही जनतेसमोर मांडण्यास तयार आहोत. असा गर्भीत इशारा मुख्याधिकार्यांनी दिला.
नगराध्यक्षा सौ. माळी यांच्या विरुध्द दाखल अविश्वास ठरावाचा अहवाल आपण जिल्ह्याधिकारी कार्यालयाचा मागणीनुसार पाठवला आहे. तो अहवाल नगराध्यक्षांच्या विरोधात जाण्याची शक्यता असल्याने सुडबुध्दीने त्यांनी हे आंदोलन सुरु केलय.
नगराध्यक्षांचे पती हे गेली तीन वर्ष कर्मचाऱ्यांना त्रास देत आहेत. त्याच्या तक्रारी प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकार्यांकडे केलेल्या आहेत . कर्मचाऱ्यांचा हा असंतोष आजचा नाहीतर गेल्या तीन वर्षाचा आहे.
नगराध्यक्षा माळी यांनी आपल्या तीन वर्षाच्या कार्यकाळात तीन मुख्याधिकार्यांच्या विरोधात कायम तक्रारी करून बदलीची मागणी केली आहे. त्यामुळे यापुढे मंगळवेढ्याला एकही मुख्याधिकारी येण्यास धजावणार नाही. नव्हे तर आता जी मुख्याधिकार्यांची नविन तुकडी प्रशिक्षण घेवून बाहेर पडलीय त्यांना तुम्ही कुठेही जा पण मंगळवेढ्याला जावू नका असे संदेश गेल्याचे सौ. पाटील म्हणाल्या. नगराध्यक्षांच्या अशा वागण्यामुळे मंगळवेढ्याची बदनामी होत असल्याचा आरोप सौ. पाटील यांनी केलाय. आजपर्यंत नगराध्यक्षांनी विकास कामांच्या प्रस्तावा पेक्षा मुख्याधिकार्यांच्या बदल्यांसाठीच जास्त पत्रव्यवहार केल्याचा टोमणा लगावला आहे.