Home Uncategorized नववर्ष जल्लोषाचा वायफळ खर्च टाळून दिली निराधारांना मायेची उब.

नववर्ष जल्लोषाचा वायफळ खर्च टाळून दिली निराधारांना मायेची उब.

1028
0

पंढरपूर:- नविन वर्षाचे स्वागत म्हणजे धांगडधिंगा, ओली पार्टी, राडा असे समीकरण रुढ झाले आहे. पण काही जागृत तरुणांमुळे हे समीकरण आता बदलत आहे. नववर्षाच्या स्वागताला होणारा वायफळ विविध सामाजिक उपक्रम राबवण्याकडे आता तरुणाई वळताना दिसत आहे. पंढरपूरच्या अक्षय कदम मित्रमंडळाने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या निराधारांना थंडीच्या कडाक्यात गरम ब्लॅंकेटचे वाटप करुन नविन वर्षाचे स्वागत केले आहे.
पंढरपूर हे तिर्थक्षेत्र असल्याने येथे निराधार लोकांची संख्या जास्त आहे. येणाऱ्या भाविकांच्या दातृत्वावर हे लोक आपले जीवन व्यथित करतात. कडाक्याच्या थंडीत या निराधार लोकांना अंगावर घेण्यासाठी साधे कापड देखिल मिळत नाही. याचीच दखल घेवून अक्षय कदम मित्रमंडळाने शहरातील सर्व निराधारांना मायेची उब देत ब्लॅंकेत वाटप केले आहे.
यावेळी राहुल साळुंखे, सुरज इंगळे,आकाश पवार, मयूर रोहिटे, योगेश सुरवसे, तुकाराम साळुंखे, ओंकार गवळी, अक्षय माने, शुभम गवळी, संकेत खुळपे, विशाल राऊत, प्रकाश राऊत आणि ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते