Home पंढरपूर नागरिकत्व कायद्या विरोधात पंढरीत मुस्लिम संघटनांचा यल्गार .

नागरिकत्व कायद्या विरोधात पंढरीत मुस्लिम संघटनांचा यल्गार .

403
0

पंढरपूर :- देशात नागरिकत्व कायद्याला दिवसेंदिवस विरोध वाढतच चालला आहे. महाराष्ट्राच्या शहरी भागातून हा उद्रेक ग्रामीण भागात देखिल पोहचला आहे. पंढरपूर मध्ये मंगळवार २४ डिसेंबर रोजी मुस्लिम संघटनांच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे.


नागरिकत्व कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी पंढरपूर मध्ये सर्व मुस्लिम संघटनांनी एकत्र येवून गेली आठवडाभर बैठकी घेतल्या. समाजातील विचारवंत, व्यावसायिक,जेष्ठ सदस्य, सामाजिक , राजकीय पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेतले. अखेर नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या शिवाय पर्याय नसल्याने मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोर्चामध्ये मुस्लिम संघटना आणि समविचारी संघटना सामिल होणार आहेत.
मंगळवार २४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता कराड नाका मस्जिद ते तहसील कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे. तहसील कार्यालयावर मोर्चा पोहचल्यानंतर या मोर्चाचे सभेत रूपांतर होईल.