Home ताज्या बातम्या निवडणूक आयोग बंगालमध्ये डोळ्यांवर पट्टी बांधून बसलाय का? अमित शहांचा आरोप

निवडणूक आयोग बंगालमध्ये डोळ्यांवर पट्टी बांधून बसलाय का? अमित शहांचा आरोप

921
0

कोलकाता : भाजपाच्या रॅलीवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करताना अमित शहा यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. पश्चिम बंगालमध्ये आयोग डोळ्यांवर पट्टी बांधून बसला आहे. आयोगाला जर लाज वाचवायची असेल तर तृणमूलच्या नेत्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शहा यांनी केली आहे.

भाजपाच्या रॅलीमध्ये कोलकात्याची जनता सहभागी झाली होती. जवळपास 8 किमीची रांग होती. यावेळी रॅलीपासून 200 मीटरवर मेडिकल कॉलेजच्या आवारातून हल्ला करण्यात आला. जनतेमध्ये भीती पसरविण्याचा हा प्रकार असून या हल्ल्याचा निषेध करतो. या हल्ल्यानंतर दीड तास रोड शो सुरु राहिला. हिंसेला उत्तर शांततेत मतदानाने द्या, असे आवाहन शहा यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here