Home पंढरपूर पंढरपूरच्या दहा किलोमीटर परिसरात चार दिवस संचारबंदी.

पंढरपूरच्या दहा किलोमीटर परिसरात चार दिवस संचारबंदी.

1063
0

पंढरपूर :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी यात्रेला भाविकांनी येवू नये यासाठी पंढरपूरात २९ जुन ते २ जुलै पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे दिला असल्याची माहिती ग्रामीण पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी दिलीय. पंढरपूरच्या दहा किलोमीटर परिसरात ही संचारबंदी लागू राहणार आहे.
वारकऱ्यांनी पंढरपूरला येवू नये अशी मागणी पोलिसांच्या वतीने करण्यात आलीय.