Home पंढरपूर पंढरपूरात डॉक्टरच निघाले कोरोना बाधित .

पंढरपूरात डॉक्टरच निघाले कोरोना बाधित .

4637
0

पंढरपूर:- पंढरपूर शहरात नव्याने तीन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. आज सापडलेले रुग्ण संपर्कातून बाधित झालेले आहेत. पंढरपुरातील ॲक्टिव्ह कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३० वर पोहोचली.
आज सापडलेल्या रुग्णांमध्ये एका बँकेचा संचालकाचा मुलगा आहे. तर याच बँकेच्या संचालकाच्या माध्यमातून बाधित झालेल्या येळे वस्ती येथील समाजसेवकाच्या मेव्हण्याचा समावेश आहे. तिसरा रुग्ण हा व्यवसायाने डॉक्टर आहे. या डॉक्टरांच्या लॅब मधील करकंब येथील एक जण कोरोना पॉझिटीव्ह आढळला होता. या लॅब असिस्टंट च्या माध्यमातून डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाली. पंढरपूर शहरातील जुनी पेठ, गोविंदपुरा तसेच गुरसाळे गावातील हे तीन रुग्ण आहेत.
प्रशासन सध्या युद्धपातळीवर पंढरपुरातील कोरोना बाधित रुग्णांची साखळी तोडण्याचा प्रयत्न करत आहे.
मात्र पेशाने शिक्षक असलेल्या व्यक्ती पासून सुरू झालेली ही साखळी तुटण्याचं नावच घेत नाही.