Home पंढरपूर पंढरपूर मधिल टोळीवर मोक्का अंर्तगत कारवाई .

पंढरपूर मधिल टोळीवर मोक्का अंर्तगत कारवाई .

2524
0

पंढरपूर :- तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथिल चव्हाण टोळीवर मोक्का अंर्तगत कारवाई करण्यात आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.
पटवर्धन कुरोलीसह पंचक्रोशीत दहशत माजवून गुन्हेगारी कारवाया करणाऱ्या दादया उर्फ दादासाहेब गोरख चव्हाण आणि त्याचा भाऊ पांड्या उर्फ पांडुरंग गोरख चव्हाण यांच्यावर मोक्का अंर्तगत कारवाई केली आहे. यातील दादया चव्हाण हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे तर पांड्या चव्हाण फरार आहे.
याबद्दल सविस्तर वृत्त असे की, पटवर्धन कुरोली येथे राहणाऱ्या या चव्हाण बंधूंनी आपल्या गुन्हेगारी टोळीतील ४० ते ५० साथीदारांसह सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणे, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले करणे, जमिनी बळकावणे, शेतीच्या वादात पडून मारामारी करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, शासकीय कर्मचाऱ्यांना जिवे मारण्याची धमकी देणे, वाळू तस्करी करणे, खंडणी,चोरी,ॲट्रॉसिटी, घातक शस्त्र बाळगणे, असे २०१३ पासून एकूण १९ गुन्हे दाखल आहे.
पटवर्धन कुरोली, तरटगाव, पिराची कुरोली, पंढरपूर, सांगोला, अकलूज परिसरात या टोळीने आपली दहशत निर्माण केली होती.
चव्हाण बंधूंच्या या गुन्हेगारी कारवायांविरोधात करकंब पोलिसांनी विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्याकडे मोक्का अंर्तगत कारवाईचा प्रस्ताव पाठवला होता. हा प्रस्ताव मंजूर झाला आहे. पुढील तपास पोलिस उपाधिक्षक डॉ. सागर कवडे हे करीत आहेत.
पोलिसांच्या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत असून गुन्हेगारांमध्ये मात्र खळबळ माजली आहे.