Home महाराष्ट्र वाळूज-पंढरपूर परिसरात तरुणाची दगडाने ठेचून हत्या .

वाळूज-पंढरपूर परिसरात तरुणाची दगडाने ठेचून हत्या .

2146
0

पंढरपूर:- वाळूज-पंढरपूर परिसरात नगर रोडजवळ मैदानात एका तरुणाची दगडाने खेचून हत्या करण्यात आल्याची घटना आज सकाळी ७.३० वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. औरंगाबाद जिल्ह्यातील वाळुज-पंढरपूर मध्ये ही हत्या करण्यात आली आहे.
नगर रोडवरील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जवळ असलेल्या मैदानात एक तरुण मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मैदानात तरुणाचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला. त्याचे डोके मोठ्या दगडाने ठेचून छिन्नविछिन्न करण्यात आले होते. यामुळे त्याची ओळख पटणे कठीण आहे. तसेच मृतदेहा शेजारीच त्याचे कपडे आढळून आले. 
पोलिसांनी श्वान पथकाच्या आधारे तपास सुरु केला. तरुणाची हत्या शुक्रवारी मध्यरात्री २.३० ते ३ वाजेच्या दरम्यान झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अत्यंत क्रूरपणे तरुणाची हत्या करण्यात आल्याने वाळूज-पंढरपूर परिसरात खळबळ उडाली आहे.