Home पंढरपूर पंढरपूर-मोहोळ मार्गावर सलग दुसरा भीषण अपघात. सांगोल्याचा युवक जागीच ठार.

पंढरपूर-मोहोळ मार्गावर सलग दुसरा भीषण अपघात. सांगोल्याचा युवक जागीच ठार.

4656
0

पंढरपूर:- पंढरपूर-मोहोळ मार्गावर स्विफ्ट कार आणि पिकअप ची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सांगोल्यातील युवक जागीच ठार तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या मार्गावरील हा सलग दुसरा अपघात आहे. मंगळवारी मध्यरात्री ईश्वर वठार फाट्याजवळ हा अपघात घडलाय.

स्विफ्ट कार (MH-09-BM-0506) मोहोळ वरुन पंढरपूरला येत होती तर पिकअप मोहोळ कडे निघाली असल्याचे समजते. स्विफ्ट मधिल प्रवासी सांगोल्याचे असून पिकअप बोहाळी गावचा आहे. पुढील तपास तालुका पोलिस करीत आहेत.