Home पंढरपूर पंढरपूर शहराच्या शेजारील “लक्ष्मीटाकळी” गाव “सील” .

पंढरपूर शहराच्या शेजारील “लक्ष्मीटाकळी” गाव “सील” .

16109
0

पंढरपूर :- शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या गावात एक सारी सदृश्य व्यक्ती सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्याचे वृत्त सोलापूर डेलीने दिले होते. त्यानंतर लगेच लक्ष्मीटाकळी ग्रामपंचायतीने गाव सील करण्याचा निर्णय घेतलाय.
ही परिस्थिती माहिती असताना पंढरपूर नगरपालिकेने आज आणि उद्या शहरात आंबा बाजाराचे आयोजन केले आहे.
लक्ष्मीटाकळी मधील एक वृद्ध महिला सारी सदृश्य असल्याने तीला महिन्यात दुसऱ्यांदा सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नगरपालिकेचा दोन दिवसांचा आंबा बाजार कसा पंढरपूरकरांच्या जीवाशी मांडलेला खेळ आहे. हे सोलापूर डेलीने आजच मांडले होते.
सोलापूर डेलीचे वृत्त हाती पडताच लक्ष्मीटाकळी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.नुतन रसाळे , ग्रामपंचायत सदस्य संदीप मांडवे यांनी तात्काळ बैठक घेवून गाव सील करण्याचा निर्णय घेतला. प्रशासनाने देखिल या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. गटविकास अधिकारी रविकिरण घोडके , पोलिस निरिक्षक किरण अवचर यांच्या समक्ष आज लक्ष्मीटाकळी गाव पूर्णतः सील करण्यात आले आहे. गावात येणारे सहाही रस्ते बंद करण्यात आले आहेत.
सदर महिलेचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर देखिल पुढील १४ दिवस गाव बंदच ठेवण्यात येणार असल्याची माहिती ग्रा. सदस्य संदीप मांडवे यांनी दिलीय.
आजच्या नगरपालिकेच्या आंबा बाजारात लक्ष्मीटाकळी गावातील देखिल नागरिक आंबे खरेदीला आले होते.
दरम्यान या महिलेचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सोलापूर डेलीशी बोलताना दिलीय.