Home पंढरपूर पंढरीतील लॉकडाऊन वाढवला.

पंढरीतील लॉकडाऊन वाढवला.

4306
0

पंढरपूर :- पंढरपूर मध्ये एक दिवसाचा लॉकडाऊन वाढवण्यात आल्याची माहिती पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली. 14 ऑगस्ट च्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत आता हा लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे.

पंढरपूर शहर आणि परिसरातील कोरोना बाधितांची साखळी तोडण्यासाठी पंढरपूर मध्ये 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट पर्यंत सात दिवसाचा लॉकडाऊन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जाहीर केला होता. गरज पडल्यास हा कालावधी पुढे तीन दिवस वाढवणार असल्याचे देखील जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले होते. त्यानुसार एक दिवसासाठी लॉकडाऊन चा कालावधी वाढवण्यात आलेला आहे. सात दिवसाच्या लॉकडाउनच्या कालावधीमध्ये प्रशासनानेच चेस दी वायरस ही मोहीम राबवली होती.
शहरातील प्रत्येक भागांमध्ये व ग्रामीण भागात गावागावांमध्ये रॅपिड एंटीजन टेस्टचे कॅम्प घेण्यात आले. यामध्ये जवळपास पाचशे ते सहाशे कोरोना बाधित रुग्ण शोधण्यात प्रशासनाला यश आले आहे.
त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पुन्हा एक दिवसाचा लॉकडाऊन कालावधी वाढवला. त्यामुळे पंढरपूरच्या प्रशासनाला पुन्हा एक दिवसाचा जादा अवधी चेस दी व्हायरस या मोहिमेसाठी मिळालाय. सात ऑगस्ट पासून सुरू झालेल्या लोक डाऊन मध्ये जे नियम होते तेच नियम 14 ऑगस्टच्या लॉक डाऊन कालावधीमध्ये असणार आहेत. ह्या एक दिवसांमध्ये फक्त सकाळी सात ते नऊ दूध विक्री , मेडिकल आणि दवाखाने या अत्यावश्यक सेवा नियमित वेळेत सुरू राहणार आहेत. तर भाजीपाला , मास विक्री सकाळी ९ ते ७ वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.