Home पंढरपूर पंढरीत ११०० जणांना एक कोटी ३२ लाखांचा गंडा .

पंढरीत ११०० जणांना एक कोटी ३२ लाखांचा गंडा .

1564
0

पंढरपूर:- दामदुप्पट रक्कम करुन देण्याचे अमीष दाखवून १ कोटी ३२ लाख रुपयांची फसवणूक झालीय. मातृभूमी रिअलटेक डेव्हलपमेंट लिमिटेड कंपनीच्या चार जणांवर पंढरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
२०१२ पासून शहरात कार्यालय स्थापन करुन ११०० ते १२०० गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे उघड झालाय . याप्रकरणी बाळासाहेब कुंडलिक लोखंडे (वय-४४, रा. शेंडेचिंच पो. मळोली ता. माळशिरस) यांनी फिर्याद दाखल केलीय.
त्यानुसार प्रदीप रवींद्र गर्ग(रा. रविराज पालम बी विंग, तामिळ चर्च जवळ मीरा रोड, ठाणे पुर्व) , संजय हेमंत बिस्वास(रा. यशराज पार्क, कासार वडवली, घोडबंदर रोड, ठाणे पुर्व) , मिलिंद आनंद जाधव( शाखेत अपार्टमेंट , उद्य नगर, पाच पाखडी , ठाणे) आणि विनोदभाई वजिरभाई पटेल(रा. नानापोंडा लुहार , ता. काप्रडा जिल्हा वलसाड गुजरात) या चौघांच्या विरोधात भादवि ४२०, ४०६, ४०९, ३४, महाराष्ट्र ठेवीदार अधिनियम १९९९ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय .