Home पंढरपूर पंढरीत बाप-लेकावर चाकूने हल्ला . पोलिसात गुन्हा दाखल .

पंढरीत बाप-लेकावर चाकूने हल्ला . पोलिसात गुन्हा दाखल .

4644
0

पंढरपूर :- हमाल म्हणून कामावर का घेतले
नाही? याचा राग मनात धरून व्यापारी बाप-लेकावर चाकूने वार केल्याची घटना पंढरीत घडली आहे. शुक्रवारी सायंकाळी ५ च्या दरम्यान इंदिरा गांधी भाजी मार्केटमध्ये ही घटना घडली आहे.

यामध्ये अशोक भीमराव बाबर आणि भीमराव विठोबा बाबर (रा.सरकारी गोडाउन मागे,पंढरपूर) हे दोघे जखमी झाले आहेत.
अशोक बाबर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार , बाबर यांचा इंदिरा गांधी मार्केट मध्ये भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. घटनेच्या दिवशी आरोपी संतोष अंकुश हुलवान आणि विठ्ठल अंकुश हुलवान(दोघे रा. गजानन मठामागे पंढरपूर) अशोक बाबर यांना आम्हाला हमाल म्हणून कामाला का घेतले नाही? याच जाब विचारत अशोक यांच्या डोक्याच्या उजव्या बाजूवर चाकूने वार केला. अशोकचे वडील यांना देखिल लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्यांच्या हातावर चाकूने वार केला. यामध्ये बाबर बाप-लेक जखमी झाले आहेत.
शहराच्या मध्यवर्ती भागात ही घटना घडल्याने एकच खळबळ माजली.
अशोक बाबर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भादवि कलम ३२६,३२३,५०४,५०६,३४ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पंढरपूर पोलिस करीत आहेत.