Home ताज्या बातम्या परिचारक विधानसभा लढणार की सेनेला साथ देणार?

परिचारक विधानसभा लढणार की सेनेला साथ देणार?

1454
1

लोकसभा निवडणुकीनंतर दोन मंत्री, एक खासदार यासोबत आता माढा मतदारसंघातून एक खासदार वाढल्यामुळे भाजपाचे मनोबल वाढणार आहे. सोलापूर नंतर पंढरपूर तालुक्यात कडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. याठिकाणी विधानपरिषद सदस्य प्रशांत परिचारक यांच्यावर भाजपाने पंढरपूर आणि मोहोळ मतदारसंघाची जबाबदारी दिलेली होती. याठिकाणी काँग्रेस पक्षाला यश मिळाले असले तरी यापुढील काळात भाजपला शिवसेना, मित्र पक्षांना सोबत घेऊन बळ वाढवण्याची एक संधी आहे.

परिचारक यांना यावेळी मताधिक्य मिळवून देण्यात यश आलेले नसले तरी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दोन खासदार आणि दोन मंत्री यांच्या मदतीने विकास कामांवर भर देत भाजपाला भक्कम करण्याची संधी मिळणार आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ महायुतीमध्ये यापूर्वी शिवसेनेच्या वाट्याला आलेला होता. यावेळीही हा मतदारसंघ शिवसेनेला सुटेल या आशेने जि. प. सदस्या शैला गोडसे यांनी आपली तयारी गेल्या वर्षभरापासून सुरू केली आहे. मतदारांच्या गाठीभेटी, कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती सुरू असते. मंगळवेढ्यातील 35 गावांचा पाणी प्रश्न असो व इतर महत्त्वाचे मुद्दे यामध्येही त्यांनी लक्ष घातले आहे. येणाऱ्या काळात परिचारक स्वतःच्या या जागेबाबत आग्रह धरणार की शिवसेनेला जागा सोडून युतीचे संख्याबळ वाढवण्यासाठी प्रयत्न करणार? याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागून राहिले आहे.

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात पाणी, एमायडीसी तसेच बेरोजगारी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पंढरपूर तालुक्यात राजकारण करीत असताना परिचारक यांनी केवळ स्थानिक पुढार्‍यांवर अवलंबून न राहता थेट जनतेत मिसळून शासनाच्या विविध योजना, कार्यक्रम याबाबत माहिती दिल्यास, त्यामध्ये थेट सहभाग नोंदविल्यास त्याचा फायदा हा त्यांना होऊ शकतो. लोकसभा निवडणूकीत मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघातील खर्डी, गादेगाव कासेगाव या भागात परिचारकांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून येते. यापुढील काळात त्याठिकाणी परिचारक यांना अधिक काम करण्याची गरज आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here